पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना 2020-21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळपिका विमा योजने आंबिया बहार मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना 2020-21
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळपिका विमा योजने आंबिया बहार मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा
-आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड/प्रतिनिधी
द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा, काजू व प्रायोगीक तत्वावर स्ट्रॉबेरी या 8 फळपिकांसाठी पुनर्रचित हवामान आधारीत फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2020-21 मध्ये या फळपिकासाठी 30 जिल्ह्यामध्ये राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सदर योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
आंबिया बहारातील गारपीट या हवामान धोक्यासाठी अतिरीक्त विमा संरक्षण देण्यात येते त्यासाठी अतिरीक्त विमा हप्ता शेतकऱ्यांना देय आहे. जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा प्रति हेक्टर विमा हप्ता पिकनिहाय वेगवेगळा असून तर विमा संरक्षित रक्कम 26 हजार 600 रुपयांपासुन 2 लाख रुपयांपर्यत आहे. तर द्राक्ष साठी 3 लाख 20 हजार रुपये आहे.
जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. या राज्य शसनाने 5 जून 2020 व 12 जून 2020 रोजीच्या निर्णयानुसार अटी शर्ती निश्चित करुन या अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोकेबाबत निकषानुसार राबविण्यात येत आहे. अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित फळपिके घेणारे कुळाने-भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होणे बाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बॅंकेला देणे अपेक्षित आहे. जेणे करुन बॅंक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस आगोदर शेतकऱ्यांचे घोषणापत्र प्राप्त झाल्यास कर्जदार शेतकऱ्यांना आंबिया बहार सन 2020-21 या हंगामा करिता योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल.
आंबिया बहारातील अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या सविस्तर माहितीसाठी कृषि विभागाचे संकेतस्थळ - www.krishi.maharashtra.gov.in पहावे. तसेच ई-सेवा केंद्र व बॅंक स्तरावरही सदर माहिती उपलब्ध करुन देण्याच्या सुचना सबंधीत सहभागी विमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागु राहणार आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.
सदर योजना सन 2020-21 आंबिया बहार मध्ये जिल्हा समुहांसाठी खालील विमा कंपन्यांमार्फत राज्यात राबविण्यात येत आहे. जिल्हा समुह निहाय भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड ही विमा कंपनी अंतर्गत बीडसह औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे व हिंगोली हे जिल्हे आहेत.
आंबिया बहार सन 2020-21 मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, काजु, केळी, द्राक्ष, आंबा (कोकण), आंबा (इतर जिल्हे), स्ट्रॉबेरी फळपिक निहाय योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत मोसंबी व केळी 31 ऑक्टोबर 2020 संत्रा, काजु व आंबा (कोकण) या साठी 30 नोव्हेंबर 2020 असून डाळिंब व आंबा (इतर जिल्हे) साठी 31 डिसेंबर 2020 आहे. स्ट्रॉबेरी 14 ऑक्टोबर 2020 आणि द्राक्षसाठी १५ ऑक्टोबर 2020 आहे. शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) योजनेतील सहभागासाठी अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था, बँक, आपले सरकार सेवा केंद्र, विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे आणि शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया या अंतिम दिनांक पूर्वी होणे गरजेचे आहे.
भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड या विमा कंपनीचा पत्ता मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्चेंज टॉवर्स, 20 वा मजला,
