राज्यव्यापी किसान काँग्रेस आंदोलनाची पूर्वतयारी साठी अंबड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बैठक

Beed

राज्यव्यापी किसान काँग्रेस आंदोलनाची पूर्वतयारी साठी  अंबड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बैठक

अबंड/प्रतिनिधी

१५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यव्यापी किसान काँग्रेस आंदोलनाची पूर्वतयारी साठी  अंबड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आलेली होती.अबंड येथील शासकीय विश्रामग्रह येथे शुक्रवारी दुपारी 
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य भिमराव पाटील डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होते. यावेळी तालुका काँग्रेस पक्षाचे निरीक्षक, भाऊसाहेब सोळुंके,पक्ष निरिक्षक गणी भाई पटेल, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठलसिंग राजपुत, अल्पसंख्यांक काँग्रेस अध्यक्ष मुस्ताक शहा, माजी नगरसेवक प्रकाश नारायणकर,जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष वैजिनाथ पाटील डोंगरे, बदनापुर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक कायंदे, तालुका उपाध्यक्ष अकबर शेख,सय्यद गणी भाई,  शहराध्यक्ष संभाजी गुढे, प्रल्हाद उगले, नवाज पटेल, सरपंच श्रीहरी डोंगरे, सलमान बागवान, बाबासाहेब घोलप, हरिभाऊ गोडसे, नारायण मुंडे, कृष्णा गायकवाड, वैभव उगले, कैलास राठोड, ईनुस भाई,सादेक बागवान,रवी डोंगर, योगेश राउत, उतम जाधव,प्रताप बमणावत, मतीन पटवा यादी होते.

पक्ष निरिक्षक गणी भाई पटेल यांनी सागिंतले   केंद्रसरकार किसान,कामगार,हामाल,मापाडी विरोधी सरकार आसून,हे सरकार बहुमताच्या जोरावर उद्योगपतीचे काम करीत आहे.यावेळी बैठकीत उपस्थित पक्ष निरिक्षक, अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य, शेतकरी,काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचे आभार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल सिंग राणा यांनी मानले.

तसेच अखिल भारतीय काँग्रेस सदस्य भिमराव पाटील डोंगरे यांनी सांगितले की किसान आज रस्तायावर उतरले आसून शेतकरी केंद्रात सरकारला या पारित केलेल्या काळया कायद्याला शेतकरी विरोद्ध करत आसून,या बिलाविरोद्धात शेतकरी,कामागार, काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरलेला आसुन, या किसान विरोधी केंद्रसरकारचा 15 ऑक्टोंबर रोजी अंबड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे आसे म्हणाले.

हाथरस प्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा दहन केल्यामुळे अंबड तालुका काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल झाल्या प्रकरणी सर्वांचा सत्कार करतांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य मा. भिमराव पाटील डोंगरे आबा, पक्षनिरीक्षक ,भाऊसाहेब सोळूंके, गणी भाई पटेल यांनी केला.

Sharing

Visitor Counter