केसापुरी वसाहत येथील मजुर निराधार भोगवटदारांना निवासस्थानासाठी पर्यायी जागा उपलब्ध करुन द्या

Beed

केसापुरी वसाहत येथील मजुर निराधार भोगवटदारांना
निवासस्थानासाठी पर्यायी जागा उपलब्ध करुन द्या

संघर्ष मजुर क्रांती संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु
 

माजलगाव/प्रतिनिधी 

शहरापासून वळच असलेल्या केसापुरी वसाहतीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे कुटुंब राहत असुन तहसील कार्यालयाने सदरील कुटुंबातील नागरिकांना वसाहतील निवासस्थानाने खाली करण्यासाठी नोटीसा पाठविल्याने वसाहतीत   राहणाऱ्या नागरिकांना बाजुलाच असलेली गायरान जमिनीवर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी संघर्ष क्रांती संघटनेच्या वतिने येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण दि १२ आँक्टो सोमवार पासुन सुरु केले आहे.

यासंदर्भात संघर्ष क्रांती कामगार संघटनेच्या वतिने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे नमुद केले आहे,की  केसापुरी वसाहतीत राहणारे कुटुंब हे मागील बऱ्याच वर्षापासुन वास्तव्यास आहोत त्यांच्यापैकी काही व्यक्तिचे कुंटुंबातील सदस्य शासकिय नौकरीतुन सेवा निवृत्त झालेले आसुन त्यांना शासनाकडुन रहाण्यासाठी केसापुरी वसहतीत निवासस्थानं मिळालेले आहेत,परंतु ते सेवा निवृत्त झाल्यामुळे त्यांचे कुटुंबात राहात असलेल्या व्यक्तिंना केसापुरी वसाहतीतील निवासस्थाने खाली करण्यासाठी तहसील कार्यालयाने संबधितांना नोटीसा पाठवल्या आहेत. केसापुरी वसाहतीत राहणारे सर्व व्यक्ति हे मजुरी करत आपआपली व कुटुंबाची कसीबशी उपजिवीका भागवितात आम्हाला मजुरीशिवाय कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन नाही , जर आम्हाला शासनाने जागा रहाण्यासाठी दिली नाही तर आमचा संसार उघड्यावर पडेल व आमचेवर उपासमारीची वेळ येईल , म्हणुन शासनाने आम्हा सर्वांचा विचार करुन आम्हाला रहाण्यासाठी बाजुलाच आसलेल्या गायरान जमीनीमध्ये जागा उपलब्ध करुन द्यावी व कोविड १९ च्या पार्श्वभुमीवर आम्ही सर्व मोठ्या संकटात आलो आहोत.व आम्हाला राहण्यासाठी सद्याला किरायाणे ही जागा भेटत नाही.त्यामुळे शासनाने आम्हा निराधार मजुरांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी.अन्यथा आम्ही सर्व निराधार व मजुर निवेदक खाली सह्या करणारे संघर्ष मजुर क्रांती संघटनेच्या वतीने दिनांक १२ आँक्टो सोमवार रोजी पासुन बेमुदत आमरण उपोषण  तहसील कार्यालयासमोर करणार  असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता त्या आनुषंगाने दि १२ आँक्टो सोमवार पासुन संघर्ष मजुर क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष शेख सादेक शेख इब्राहिम, मुख्तार ( राजु ) इसामिया कुरेशी संघर्ष मजुर क्रांती संघटना ( सचिव ) शब्बीर रईस शेख संघर्ष मजुर क्रांती संघटना (ता.अध्यक्ष ) यांनी येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

Sharing

Visitor Counter