नगर परिषद प्रशासनाचा कारभार सुस्त

Beed

नगर परिषद प्रशासनाचा कारभार सुस्त
  
धारूर/प्रतिनिधी

किल्लेधारूर नगर परिषद मध्ये नागरिकांच्या कामासाठी अधिकारी उपलब्ध नसतात त्यामुळे शासकीय स्तरावरील कागदपत्रे साठी पंधरा ते वीस दिवस वाट पाहावी लागत आहे यामुळे त्या ठिकाणच्या कारभार हा देवाच्या भरवशावर चालत का?असा सवाल नागरिक करत आहेत                           
        नगर परिषद मध्ये सर्व सामान्य माणसाच्या समस्या व त्याना नगर परिषद मधून मिळणारी कागदपत्रे साठी अर्ज केल्या नंतर ही पंधरा ते वीस दिवस लागत आहेत कार्यलयत विचारणा केल्या असता साहेब बाहेर गेलेत,आले नाहीत ,सुट्टी वर गेले त्याच्या सही राहिले आहेत असे सांगितले जाते त्यामुळे कागदपत्रे सही करणारी व्यक्ती उपलब्ध नसल्याने ते मिळण्यास विलंब होत आहे कोणतेही कागदपत्रे मिळण्यासाठी एक मर्यादित दिवसात ते मिळणे अपेक्षित असताना अधिकारी व कर्मचारी मुळे अनेक दिवस लागत आहेत त्यामुळे नागरिकांचे शासकीय काम होत नाहीत तसेच या कोरोनाच्या काळात ही नागरिकांचे समस्या ऐकण्यासाठी संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने त्या कोणाला सांगाचे हा प्रश्न नागरिक समोर उपस्थित होते आहे त्यामुळे प्रशासनाचा कारभार सुस्त व देवाच्या भरावसे चालू आहे असे नागरिक मधून बोले जात आहे

Sharing

Visitor Counter