पंचनाम्याला वेळ न घालवता शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करा- सुग्रीव लाखे

पंचनाम्याला वेळ न घालवता शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करा- सुग्रीव लाखे
गेवराई/प्रतिनिधी
शेतकरी हा अनेक अडचणींच्या माध्यमातून शेतातील पांढऱ्या सोनं नावाच्या कापूस उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो परंतु काही दिवसापासून शेतकरी हा अडचणींचा सामना करून शेतातील कापूस सोयाबीन उत्पादन चांगल्या पद्धतीने घेत असताना त्यामध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पावसाच्या मुसळधार पडल्यामुळे शेतकरी हा खूप मोठ्या प्रमाणात मेटाकुटीला आलेला आहे शेतकऱ्यांच्या पदरी कायम उपेक्षाच राहिल्या आहेत सातत्याने कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांचा जीव घेत आहे माझा शेतकरी मायबाप शेतामध्ये काबाडकष्ट करून हाडाचा काढा आणि रक्ताचं पाणी करुन मोत्याचे दाणे पिकवतो पण त्याच्या पदरी कायम उपेक्षाच राहते या परिस्थितीमध्ये शासनाने तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी शेकापचे युवा नेते सुग्रीव लाखे पाटील, यांनी केली.
पुढे लाखे म्हणाले की आता चार दिवसापासून सतत मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हातातोंडाशी आलेला कापसाचा घास वायाला गेला आहे शेतामध्ये असलेला कापूस फुटुन वेचणीच्या वेळेस पावसाने खूप मोठ्या प्रमाणात सतत मुसळधार 24तास पाऊस चालू असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभा असलेला कापूसाच्या वाती तयार झालेल्या आहेत तर सोयाबीन हे काळे पडले आहे शेतकऱ्यावर हे सुलतानी संकट आलेले असून शासन-प्रशासन आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी याबाबत विशेष लक्ष घालून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करून शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय कुठल्याही प्रकारचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने व केंद्र सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई तात्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आधार द्यावा असे देखील सुग्रीव लाखे पाटील, यांनी म्हटले आहे.
