धारूर तहसील कार्यालयातील पी एम किसान योजना विभाग वाऱ्यावर

Beed

धारूर तहसील कार्यालयातील पी एम किसान योजना विभाग वाऱ्यावर

मागील लाखो रुपयांच्या भ्रष्टाचारा मुळे चार्ज घेण्यास कर्मचारी तयार होईना

किल्ले धारूर/प्रतिनिधी

धारूर तहसील कार्यालयातील पंतप्रधान किसान सन्मान योजना हा विभाग सध्या वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे या विभागाचा चार्ज तहसील कार्यालयातील कोणताही लिपिक ,कर्मचारी घेण्यास तयार होईनात यामुळे शेतकऱ्यांची कामे सध्या खोळंबली आहेत

सोमवारी धारूर तहसील कार्यालयात पी एम किसान योजन नाव समाविष्ट करण्यासाठी काही शेतकरी तहसील कार्यालयात गेले असता त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याकडे नाव समाविष्ट करण्याची मागणी केली यावेळी कार्यालयातील कर्मचारी कोकरे म्हणाले हा विभाग माझ्याकडे नाही मी ह विभाग देवकते यांच्याकडे दिला आहे संबंधित शेतकऱ्यांनी देवकते यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले हा विभाग माझ्याकडे नाही मी याचे काम मी पाहू शकत नाही या दोन कर्मचाऱ्यांची टोलवाटोलवी सुरूच होती शेवटी शेतकऱ्यांनी कदरून येथील पत्रकार नाथा ढगे, अतिक मोमीन, सतीश पोतदार, रवी गायसमुद्रे यांच्याशी संपर्क करून आम्ही सकाळपासून चार वाजेपर्यंत तहसील कार्यालयात आहोत परंतु आम्हाला पी एम किसान योजनेची माहिती कुठलाही कर्मचारी देत नाही हा विभागआमच्याकडे नाही अशी टोलवाटोलवी सुरू असल्याचे सांगितले 

पत्रकार बंधुंनी दोन्ही कर्मचाऱ्यांकडे संपर्क साधला असता असे दिसून आले की पी एम किसान योजना विभाग सध्यातरी वाऱ्यावरच आहे या विभागाचा चार्ज घेण्यास कर्मचारी तयार नसल्याने अडचणी निर्माण झाले आहेत सखोल चौकशी केली असता मागील काही महिन्यात पी एम किसान योजनेला ज्यांच्या नावे एक गुंठे जमीन नाही अशा बोगस शेतकऱ्यांची नावे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून लावण्यात आली आहेत यामुळे आपल्या अंगलट काही येईल त्यामुळे कोणताही कर्मचारी चार्ज घेण्यास तयार होईना

पी एम किसान योजनेत खरे लाभार्थी सोडून बोगस लाभार्थी यांची नावे मोठ्या प्रमाणात समाविष्ट करण्यात आली आहेत नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी तक्रारी करून देखील  कुठलाही परिणाम झालेला दिसून येत आहे तेरी भी चूप मेरी भी चुप असा कारभार सद्या तहसील कार्यालयात दिसून येत आहे

पी एम किसान योजना हा विभाग कर्मचारी यांच्या कडे देवून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत

Sharing

Visitor Counter