बलभीम महाविद्यालयातील प्राध्यापक अब्दुलकादर मनियार यांना पुरस्कार

बलभीम महाविद्यालयातील प्राध्यापक अब्दुलकादर मनियार यांना पुरस्कार
बीड/प्रतिनिधी
येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक अब्दुलकादर रफिक मनियार यांना 'द होम ऑफ लेटर्स'(इंडिया) यांच्या वतीने पुरस्कार प्राप्त झाला आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी कला, संस्कृती,साहित्य व शिक्षण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्याला हा पुरस्कार प्रदान केला जातो. या वर्षी कला, साहित्य, संस्कृती व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रा.अब्दुलकादर मनियार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डाॅ. बाबासाहेब कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डाॅ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डाॅ.गणेश मोहिते, प्रा. सुधाकर ढवळे,डाॅ.अमोल पालकर, डाॅ.रवींद्र काळे, प्रा. संदीप परदेशी, प्रा.पांडुरंग गायकवाड यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.
