नयनराऊत या महिलेस पोलिसांकडून बेदम मारहाण

Beed

नयनराऊत या महिलेस पोलिसांकडून बेदम मारहाण 

बीड/प्रतिनिधी

पोलिस ठाण्यात बोलावून पोलिस निरीक्षकाने महिला पोलिसांकडून नयन मधुकर राऊत रा.लोणारपूरा यांना बेदम मारहाण केली .यात त्यांच्या डोळ्याला इजा झाली या प्रकरणी नयन राऊत यांनी डीवायएसपी बीड यांना निवेदन दिले . निवेदनात म्हटले आहे की ,पेठ बीड पोलिसांनी भांडण मिटवून घेण्यासाठी पोलिस ठाण्यात बोलावले यावेळी ठाण्यात गेल्यांनतर भांडण वैगेरे काही झाले नाही असे सांगितले.यावेळी आपण घर सोडणार नाही असे म्हटल्यानंतर पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी महिला पोलिस शिपायास मारहाण करण्याचे सांगितले.मारहाण करण्याचा अधिकार नसतांना देखील केलेल्या मारहाणीत आपल्या डोळ्याला इजा झाली असल्याचे नयन राऊत यांनी निवेदनातून नमुद केले.

Sharing

Visitor Counter