किल्ले धारूर शहरात शेतकरी गटा मार्फत भाजी, फळे विक्रीस सुरुवात
Dharur

धारूर/इरफान शेख
धारूर शहरात आज शेतकरी गटाना कृषी कार्यालया मार्फत परवाने देवून भाजी फळे विक्रीस सुरुवात करण्यात आली.
आज तालुक्यातील सात शेतकरी गटांना परवाने देण्यात आले गांजपुर येथील भगवानबाबा शेतकरी गटाने भाजी विक्रीस सुरुवात केली शहरात वीस शेतकरी गट नोंदणी करतील असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
यावेळी तहसीलदार सौ वंदना शीडोळकर, मुख्याधिकारी सुहास हजारे, नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारी, उपनगरअध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, समिती सदस्य युथ क्लबचे सूर्यकांत जगताप, मिथुन गायसमुद्रे,भ्रष्टाचार निर्मूलनचे सादेक इनामदार पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश काळे व पत्रकार बांधव उपस्थित होते.