घरी रहा!! सुरक्षित रहा!!----अँड अंनुजा मुळे अहं नगरकर

(बीड प्रसार न्युज)
कधी नवत या कोरोनामुळे ऑफिसवाल्या मंडळींसाठी वर्क फ्रॉम होम तर झालंच, पण आमच्या कामवाल्या बाईला भरघोस बोनस मिळावा तशी ऑफिशियली सुट्टी मिळाली! मग काय विचारताय, स्वतःला लॉक डाऊन केल्यामुळे घरात पुरुष मंडळींनी सुद्धा स्वयंपाकघराचा ताबा घेतला, आणि रोज एक खवय्येगिरी करत भांड्याचा पसारा एरव्ही पेक्षा ढीगभर वाढवला!
अहो, तुम्ही तर ते वाचलंच असेल, नाही हो नाही किंबहुना तुमच्याकडेही तेच फॉरवर्ड झालेलं टाईमटेबल फॉलो होत असेल, तेच ते हो, सकाळी उठणे, मग पहिला चहा म्हणता म्हणता दिवसभर ७-८ कप घेत रहाणे, सतत फेसबुक, व्हॉटसअप, इंस्टा चेक करणे, वेळ मिळालाच आहे तर व्हॉटसअप वरच्या कधी मेसेज सीन न केलेल्या ग्रुपमध्ये डोकावून आलेल्या फॉरवर्ड मेसेजेसवर साधक बाधक चर्चस करणे, अधून मधून न्यूज अपडेट पहाणे,ते बघून टेन्शन घेणे,आणि त्यावर विचार करीत पुन्हा चहा ढोसणे, आणि तोच चहा घे घरीबसून वजन वाढेल की काय या विचाराने उद्यापासून चहा बंद म्हणत चहाचा शेवटचा घोट गोडीने पिणे! हल्ली तर आज कोणता वार आहे हे सुद्धा कळत नाही!! असो विनोदाचा भाग सोडला तर, हे सगळं जे काही थैमान आपल्या दैनंदिन आयुष्यात चालू झालं ते कोरोना नावाच्या भयानक विषाणूंमुळे!!
कोरोनाचा कहर आपल्या भारतात तर आहेच पण, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे, या परिस्थितीचं गांभीर्य नागरिकांनी, आपल्या सारख्या सामान्य माणसांनी समजून घ्यावं यासाठी प्रशासकीय यंत्रणा,पोलिस यंत्रणा, हॉस्पिटलस, डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार, पत्रकार वर्ग अहोरात्र काम करीत आहे, आपल्या जीवाचीही पर्वा न करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सगलिव्ह मंडळी झटत आहे,जमावबंदी, सामाजिक अंतर पाळा!! म्हणून सतत आपल्याला सांगितलं जातंय, आणि या सगळ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एकजूट दाखवणं, एकी दा-अँड अंनुजा मुळे अहं नगरकर








