धारूर शहरात भिम जयंती घरा घरातून भिम जयंती साजरी केली

Dharur

धारुर/प्रतिनिधी 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ वी जयंती घरा-घरातून भिम जयंती साजरी करण्यात आली किल्लेधारुर शहरात घरा घरातून साजरी करण्यात आली.
जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रातही शिरकाव केला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. 

कोरोना या विषाणू संसर्गाचा एकजुटीने सामना करने ही सर्वांचीच सामुदायिक जबाबदारी आहे.यातच १४ ऐप्रिल हा दिवस म्हणजे या दिवशी जग भरात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्नमहामानव, युगपुरुष, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मोट्या उत्साहाने जयंती साजरी करतात.

 परंतु या वर्षी कोरोणा विषाणूने हाहाकार माजला असुन या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या वर्षीची भिम जयंती घरा घरात साजरी करुण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.

Sharing

Visitor Counter