धारुर नगर पालिकेला विविध मागण्यांसाठी AIMIM च्या वतिने घेराव घालत दिले निवेदन

धारुर नगर पालिकेला विविध मागण्यांसाठी AIMIM च्या वतिने घेराव घालत दिले निवेदन
किल्लेधारुर/प्रतिनीधी
धारुर शहरातील AIMIM च्या वतीने नगर पलिकेला विविध मागण्यासाठी घेराव घालत निवेदन देण्यात आले.शहरातील वार्ड क्र.1 आझाद नगर मधील नळाला आलेल्या पिण्याच्या पाण्याचा वास हा नाली गठार सारखा वास येत आहे. नळाला दुषित आलेल्या पाण्यामुळेच नागरिकाचे व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे.नळाला दुषित पाणी येत असल्यामुळेच सर्दी, खोकला, डेंगू मलेरिया, टायफाईड असे अनेक आजार होत आहेत.
आझादनगर मधील गेल्या दोन वर्षांपासून लाईट चे खांब फक्त नावालाच आहेत.कारण यावर लावलेल्या टुबलाईट बंद असल्यामूळे या फक्त शोपीस बनल्या आहेत. आझादनगर मधील समस्त नागरिकांनी या आगोदर नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते परंतु नगरपालिकेन यावर काही काम केले गेले नाही. नगर परिषदेने तात्काळ या प्रश्नावर लक्ष द्यावे नाही तर काम न झाल्यास दि.10/11/2020 वार मंगळवार रोजी नगर परिषद समोर AIMIM तर्फे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा या निवेदना मार्फत देण्यात येत आहे.यावेळी AIMIM चे शहराध्यक्ष मुबिन सहाब, तालुका अध्यक्ष अफरोज पठाण, , माजलगाव प्रभारी सिद्धीक भैया,सोशल मिडिया शेख असलम,असेफ, बबलू,आयुब शेख, गुद्दु मकांनदार ई.निवेदन देताना उपस्थिती होते.