वडवणी नगर पंचायत वार्ड क्र .५ मधून शिवसेनेच्या प्रमिला माळी निवडणूक लढणार

Beed

वडवणी नगर पंचायत वार्ड क्र .५ मधून शिवसेनेच्या प्रमिला माळी निवडणूक लढणार

वडवणी/प्रतिनिधी

नगरपंचायत सार्वत्रिक आलेल्या निवडणूक २०२० चे आरक्षण नुकतेच जाहीर झालेले आहेत. त्या अनुषंगाने बर्‍याच विद्यमान नगरसेवकांचे स्वप्न भंग झाले आहे. आपण आपल्या वार्डाचे केलेली तयारी पूर्णता निकामी झालेली आहे आणि आता नव्याने वॉर्डात आरक्षण पडलेले आहेत त्यातच वार्ड क्रमांक ५ सर्वसाधारण ला सुटल्याने तिथे शिवसेना जिल्हा उपसंघठक तथा महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्षा प्रमिला माळी डरकाळी फोडणार आहे.

गेले अनेक वर्षे शिवसेनेच्या वडवणी तालुका प्रमुख महिला आघाडी व आता जिल्हा उपसंघटक या पदी पर्यंत काम करत आलेल्या आहेत महिला संघटन खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी वळवणी तालुक्यामध्ये उभा केलेला आहे. पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. अनेक सर्वसामान्य महिलांचे काम असतील, विविध योजना असतील, सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम त्या पक्षाच्या माध्यमातून करत आलेली आहेत. स्वतः वॉर्ड क्रमांक ५ मध्ये राहत असल्याने सर्वसामान्य माणसाशी त्यांची नाळ जोडली आहे. म्हणून वडवणी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० या मध्ये त्यावर क्रमांक ५ मधून लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्या स्वतः वार्ड क्रमांक ५ मध्ये जगदंबा महोत्सव असेल, गणपती ती उत्सव असेल, वेगवेगळ्या माध्यमातून मदत देण्याचे काम असेल त्या नित्यनियमाने करतात .महाराष्ट्र मध्ये आघाडी सरकार आहे पण वडवणी नगरपंचायत निवडणूक २०२० आघाडी होईल की नाही याबाबत शंकाच !आहे परंतु येथील भावी उमेदवाराने आपली तयारी करून ठेवलेली आहे. पक्षांचा जसा आदेश आहे त्या पद्धतीने सर्वजण काम करणार आहेत परंतु वार्ड क्रमांक ५ मधून शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक प्रमिला माळी स्वतः आपलं नशीब आजमावणार आहेत पक्षाशी एकनिष्ठ सर्वसामान्य जनतेने केलेले काम हे त्यांना नक्कीच उपयोग होणार आहे. त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असेल हे काही दिवसात कळेलच मी वार्ड क्रमांक ५ ची सेवा करण्यास सक्षम आहे असं मत त्यांनी दैनिक बीड प्रसारशी बोलताना व्यक्त केले.

Sharing

Visitor Counter