संस्थेच्या माध्यमातून दिपक आगळे यांचं समाजासाठी मोठे कार्य !..मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील

संस्थेच्या माध्यमातून दिपक आगळे यांचं समाजासाठी मोठे कार्य !..मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील
बीड/वार्ताहर
शिरसगांव येथील स्व.सखाराम बाळा पाटील आगळे सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक आगळे पाटील यांचे संस्थेच्या माध्यमातून सामाजासाठी खुप मोठे योगदान देत असुन भविष्यात देखील असी समाजसेवा दिपक आगळे पाटील यांच्या कडून घडावी असे उदगार मा.मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.
तसेच पुढे म्हणाले की राज्यात अनेक संस्था आहेत त्या फक्त नावापुरत्याच आहे.पन आगळे पाटील सेवाभावी संस्था ही खुप चांगले काम दिपक आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.
या प्रसंगी प्रवरानगर येथे जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा स्व.सखाराम बाळा पाटील आगळे सेवाभावी संस्थेच्या वतीने कोविड 19 योध्दा गैरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.यावेळी ना. राधाकृष्ण विखे पाटील.मा.ना.शालिनीताई विखे पाटील. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक आगळे पाटील.जय श्री राम ग्रुप चे प्रमुख मार्गदर्शक श्री संतोष काळे पाटील.दादासाहेब नाबदे.रविद्र औताडे.विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
