शेकटा येथे लोकवर्गणीतून खाणभिंत बंधारा कामाचे भूमिपूजन

शेकटा येथे लोकवर्गणीतून खाणभिंत बंधारा कामाचे भूमिपूजन
वसुंधरा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम : मुक्या प्राण्यांची होणार पाण्याची सोय
गेवराई/वार्ताहर
गेवराई तालुक्यातील शेकटा येथील फिरंगाईचा डोंगर येथे मोठी खाण असून या खाणीमधून वर्षानुवर्ष पाण्याचा मोठा विसर्ग होत होता. ही बाब गावातील सामाजिक सलोखा जपणार्या वसुंधरा प्रतिष्ठाण हेरत या खाणीवर मोठी भिंत बांधण्याचा एकमुखी निर्णय ठरला व आज दीवाळी पाडव्याचा मुहूर्त साधत खाण भिंत बांधकामाचा नारळ लोकसहभागातून साधू संतांच्या उपस्थितीत पार पडला.
वसुंधरा प्रतिष्ठान शेकटा गेल्या दोन वर्षापासून समाजकार्य करत आहेत ही संस्था लोकसहभागातून वृक्षलागवड व पाणी आडवा पाणी जिरवाची कामे करत आहेत. आज पाडव्याच्या मुहूर्तावर लोकसहभागातून वर्गणी जमा करून फिरंगाई डोंगरात खाणभिंत बांधण्याचा उपक्रम या प्रतिष्ठाण ने हाती घेतला आहे या कामात गावकरी व प्रतिष्ठाण सहभागी असून ही खाणभिंत बांधल्याने लाखो लिटर पाणी साठवले जाणार आहे या पाण्याचा उपयोग गावातील जनावरे पाळीव प्राणी व इतर जीवसृष्टीला होणार असल्याने व उन्हाळ्यात कायम पाणी साठा राहणार असल्याने हे काम लोकसहभागातून व गावकऱ्यांच्या वर्गणीतून प्रतिष्ठाण करणार आहेत गेली दीड - दोन वर्षे झाली सामाजिक बांधिलकी जपत वृक्ष लागवड व पाणी आडवा पाणी जिरवा ची कामे अविरत ही संस्था करत आहे असाच आगळावेगळा पाणी आडवा पाणी जिरवा कार्यक्रम आज पाडव्याच्या मुहूर्तावर या प्रतिष्ठाण ने हाती घेतला आहे याप्रसंगी मच्छिंद्रनाथ गड मठाधिपती ह-भ-प महंत जनार्दन महाराज शिंदे यांच्या हस्ते खाण भिंत उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रतिष्ठाणचे सर्व सदस्य कार्यकारणी व शेकटा गावातील मंडळी यावेळी उपस्थित होते यावेळी चकलांबा, पौळाची वाडी, शृंगारवाडी पंचक्रोशीतील वृक्षप्रेमी याठिकाणी उपस्थित होते लोकसहभागातून होणारा हा उपक्रम खर्चिक असला तरी या बंधाऱ्याचा उपयोग प्राणिमात्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे.
