वार्ड क्रमांक 15 मधून ए.आय.एम.आय.एम चे अधिकृत उमेदवार कुणाल गौतम खरात यांना मतदार संघाचा पाठिंबा-शेख सलमान

वार्ड क्रमांक 15 मधून ए.आय.एम.आय.एम चे अधिकृत उमेदवार कुणाल गौतम खरात यांना मतदार संघाचा पाठिंबा-शेख सलमान
बीड/प्रतिनिधी
मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील उमेदवार कुणाल गौतम खरात यांना वार्ड क्रमांक 15 मधुन पदवीधर मतदार संघाचा पाठिंबा देण्यात येत असल्याचे शेख सलमान यांनी सांगितले आहे व तसेच विजय निश्चिंत असल्याचा दावा देखील शेख सलमान यांनी केला तर पदवीधर उमेदवार कुणाल गौतम खरात हे निवडून आल्यावर राज्यातील सर्व क्षेत्रातील पदवीधरांची समस्याचं निवारण करण्याचे अश्वासन देखील गौतम खरात यांनी दिले व पदवीधरांसाठी शिक्षक भरतीसाठी आवाज उठविणार असल्याचे सांगितले.
जनतेच्या हिताचा विचार करून वार्ड क्रमांक 15 मधून ए.आय एम.आय.एम या पदवीधर मतदान संघातील उमेदवार अॅड. कुणाल गौतम खरात यांना पदवीधर मतदारांचा पाठिंबा देणार असल्याचे शेख सलमान यांनी सांगितले.
