शासनाने लाॅकडाऊनमध्ये अॅटो चालविण्याची परवानगी द्यावी नसता आर्थिक मदत द्यावी- प्रा. इलियास इनामदार

Beed

बीड/प्रतिनिधी

कोरोना व्हायरसमुळे देशात लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेक गोरगरीब कामगार, मजुर, शेतकरी, टॅक्सी ड्रायव्हर, छोटे छोटे कामधंदे वाले यांना उपाशी मरण्याची वेळ आलेली आहे यामध्ये अॅटो चालक पण आहेत.  

आपल्याला माहीत आहे गरीब असो मध्यमवर्गीय असो श्रीमंत असो सर्वांना अॅटोची आवश्यकता असते शासनाने परमिट व परवानाधारक अॅटो चालकांना अॅटो चालविण्याची परवानगी द्यावी नसता जिल्हाधिकारी साहेबांनी जिल्हापातळीवर आर्थिक मदत देणयाचा निर्णय घ्यावा जेने करुन गोरगरीब अॅटो चालकांवर उपासमारीची वेळ येवू नये.

अशी मागणी जिल्हाधिकारी साहेबांना लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी व सोबत पञकार इमरान फारुकी, शेख सलीम अहेमद, शेख राजू गुलाब, अर्जून तागड, सखाराम लोनके, शेख आरको, नवनाथ गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे. व निवेदनावर पन्नास ते साठ अॅटो चालकांच्या सह्या आहे.

Sharing

Visitor Counter