धारूर येथे गुरुवार पासून कापूस खरेदी केंद्र सुरू होणार :-सचिव सोळंके.

Dharur

किल्ले धारूर (प्रतिनिधी इरफान शेख)

      धारूर कृषि उत्पन्न बाजार समिती च्या अंतर्गत धारूर व भोपा येथे शासनाच्या व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 23 एप्रिल पासून कापूस खरेदी केंद्रे सुरू होत असल्याची माहिती बाजार समिती चे सचिव  दत्ता सोळंके यांनी एका प्रसिद्धीपञकाद्वारे दिली आहे. 

      याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पञकात म्हटले आहे की,  सर्व कापूस उत्पादक शेतकर्यांनी   आपला कापूस  विक्री करण्याकरिता बाजार समितीचे कर्मचारी बाबुराव काकडे- मो. क्र. 9637616368,दयानंद वाघचौरे-मो. क्र. 9420653547, गणेश शिनगारे- मो. क्र.9890294053 , ब्रम्हानंद उजगरे-मो. क्र. 9552498977 यांचेशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

तसेच  प्राथमिक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना जिनींगवर कापूस आणण्यासाठी बाजार समितीकडून फोनद्वारे कळविण्यात येईल व बाजार समितीकडून फोन आल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत कापूस खरेदी केंद्रावर घेवून येवू नये , सदर कापूस स्विकारला जाणार नाही व तसे केल्यास  मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल.याची नोंद घ्यावी. 

सदर कापूस खरेदी दि.23 एप्रील 2020 पासून सकाळी 10-00 ते दुपारी 2-00 या कालावधीतच  खरेदी करण्यात येईल. यापूर्वी दि.13/03/2020 पर्यंत बाजार समितीकडे प्राथमिक नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचीच कापसाची खरेदी करण्यात येईल. तसेच FAQ दर्जाचाच कापूस खरेदी  केंद्रावर  शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाचे परिपत्रकानुसार स्विकारण्यांत येईल . शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेला कापूस हा काडी कचरा विरहीत आणावा. तसेच कापूस विक्री करतेवेळी अद्यावत 7/12, त्यांचे आधारकार्ड व बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची सुस्पष्ट झेरॉक्स प्रत रहिवाशी प्रमाणपत्र हे  कागदपत्रे शेतकऱ्यांनी कापूस विक्री करताना आणणे आवश्यक आहे.  शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर येताना खालील मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे.

1) कापूस खरेदी केंद्रावर येताना स्वत: शेतकऱ्याने उपस्थित रहावे. तसेच चेहऱ्यावर मास्क लावूनच खरेदी केंद्रावर प्रवेश करावा. 

2) कापूस घेवून येताना स्वत: शेतकरी व गाडीचा ड्राईव्हर व्यतिरिक्त इतर अनावश्यक कोणासही सोबत आणू नये नसता नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

3) कापूस खरेदी केंद्रावर सोशल डिस्टन्स् चे काटेकोर पालन करावे.

4) शेतकऱ्यांनी कापूस भरलेल्या वाहनावर अत्यावश्यक सेवा (कृषिमाल) असे स्टीकर लावावे.

  अश्या सर्व नियमांचे पालन करण्यात यावे असे आवाहन धारूर कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव दत्ता सोळंके यांनी केले आहे.

Sharing

Visitor Counter