रोटरी क्लब धारूरने केले ६०० मेडिकल किटचे वाटप नागरिकांच्या आरोग्यासाठी केली मदत

किल्ले धारूर/नाथा ढगे
आज बुधावरी धारूर रोटरी क्लब ने शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने ६००, मेडिकल किट वाटप करून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे कोरोना या विषाणू जगात थैमान घातले आहे कोरोना या विषाणू पासून बचाव होण्यासाठी नागरिकांना रोटरी क्लब ने पत्रक वाटून मेडिकल किट देवून जनजागृती केली
यात साबण, सिनेटायझर, मास्क, हॅन्ड वॉश इत्यादी साहित्याचे किट तयार करून घरोघरी वाटप करत आहेत
यावेळी धारूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ स्वरूप सिंह हजारी, तहसीलदार वंदना शिडोळकर , मुख्याधिकारी सुहास हजारे,नायब तहसीलदार विटेकर, पोलीस निरीक्षक सुरेखा धस, वैद्यकीय अधिकारी चेतन आदमाने, यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरगरीब गरजुवंत नागरिकांना वाटप करण्यात आले रोटरी क्लबचे अध्यक्ष अमोल गुळवे म्हणाले मेडिकल किट ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे कोरोना विषाणू पासून बचाव होण्यासाठी आम्ही जनतेला सामाजिक भावनेतून मदत करत आहोत रोटरी सचिव विजयसिंह दिख्खत म्हणाले संपूर्ण धारूर शहरातील आम्ही किट वाटप करणार आहोत कमी पडल्यातर आणखी आणून वाटप करू
रोटरी क्लबचे सदस्य आनंद पिलाजी, सतीश पिलाजी, पंजाब शिनगारे, संदीपान तोंडे, देिपक गुळवे, नगरसेवक रुपेश चिद्रवार, अनिल चिद्रवार, निलेश डूबे, गजानन डूबे इत्यादी सदस्य घरोघरी जावून मेडिकल किट वाटप करत आहेत
रोटरी क्लबने नागरिकांच्या आरोग्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविल्याने धारूर तालुक्यात रोटरी क्लबचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
