डॉ.मोगले सर यांचे कोरोना बदल उपयुक्त मार्गदर्शन शहरी बेघर निवाराकेन्द्रात

बीड/प्रतिनिधी,
जिव्हाळा शहरी बेघर निवाराकेन्द्रात डॉ. मोगले सर यांचे कोरोना बदल उपयुक्त मार्गदर्शन.
आज दि.२३/०४/२०२० रोजी बेघर निवाराकेन्द्रात असलेल्या बेघर ,निराधार, मजुर ,दिव्यांग अशा सर्व बेघरांसाठी कोरोना आणि मानसिक आरोग्य या विषयावर मोलाचे मार्गदर्शन शासकीय रुग्णालयाचे मानसउपचार डॉ.सुदाम मोगले आणि त्यांचे डॉक्टर सहकारी यांनी केले .
या प्रसंगी त्यांनी सर्व लाभार्थ्यांना या काळात स्वतः ची काळजी घेतांना ,तोंडाला मास्क लावले पाहिजे, वेळोवेळी सँनीटायझर नसेल तर किमान साबनाने हात धुवुन घेतले पाहिजे. शोशल डिस्टंगशिग ठेवणे गरजेचे आहे,शक्यतो गर्दीच्या ठीकाणी जाऊ नका अशा प्रकारे बेघर निवाराकेन्द्रात शासकीय रुग्णालयाच्या वतीने जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शोशल डिस्टंग पाळण्यात आले.
या प्रसंगी बेघर निवारा प्रमुख राजु वंजारे, अभिजित वैद्य, शालीनी परदेशी ,रमेश वीर ,यश वंजारे आणि निवाराकेन्द्रातील सर्व लाभार्थी उपस्थित होते.
