अहंकाराने मनुष्य जीवनाचे पतनच होते

अहंकाराने मनुष्य जीवनाचे पतनच होते
ह भ प भागवताचार्य सचिनजी महाराज सपकाळ
कवडगाव/प्रतिनिधी
मानवी जीवन जगताना नम्रतेने मधुर वाणीने सर्वांशी बोलावे आपला अहंकार दूर ठेवावा अहंकारामुळे मानवी जीवनाचे अतोनात नुकसान होते नव्हे नव्हे तर जीवनच उध्वस्त होते त्यासाठी अहंकार बाजूला ठेवून सत मार्गाने जीवन व्यतीत करा असा मौलिक विचार ह भ प सचिन महाराज सपकाळ यांनी कवडगाव येथील चालू असलेल्या संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यात तिसरे पुष्प गुंफतांना प्रतिपादन केला
कवडगाव येथे सुरु असलेल्या श्रीमद संगीत भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यामध्ये गोकर्ण उपाख्यान तसेच महाभारतातील प्रसंगा दरम्यान भीष्माचार्य चा उत्तरायणामध्ये देह त्याग करण्याचा संकल्प व शेवटच्या क्षणी भगवान श्रीकृष्णांचे मनोभावे केलेले चिंतन यामुळे सर्व भक्तीमय वातावरण झाले होते
या कथे दरम्यान महाराजांनी दारात गाय व घरात माय किती महत्वाची आहे याचे विविध उदाहरणे देऊन श्रोत्यांना महत्त्व पटवून दिले गाईच्या जवळ 33 कोटी देवांचा वास आहे तर गाईच्या शेनामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी वसलेली आहे आणि गाईच्या गोमूत्रामध्ये पवित्र गंगेचे वास्तव्य आहे हे सांगितले पुढे राजा परीक्षितीला आपण राजा असल्याचा अहंकार झाला व या अहंकारातच त्याने ऋषींच्या गळ्यामध्ये बाणाच्या टोकाने साप टाकून ऋषींची चेष्टा केली याचा राग येऊन ऋषींच्या मुलाने अहंकार झालेल्या राजाला शाप दिला अशी कथा झाली
लक्ष 84 योनीचा फेरा पार करून मिळालेल्या या नरदेहाचे नारायण व्हावे असे वाटत असेल तर आपण सर्वांनी आपल्या मधील अहंकार द्वेष बाजूला सारून प्रेमाने वागावे लीनतेने वागावे मनामध्ये सर्व विषय आदरभाव ठेवावा तसेच सर्वांशी प्रेमाने राहून आपले जीवन व्यतीत करावे असे बहुमोल वचन आपल्या कथेमध्ये श्रोत्यांना सांगितले.
या संगीतमय श्रीमद् भागवत कथेला संगीत साथ ह.भ.प. माऊली महाराज घुमरे, ह.भ.प.कुसुमताई सपकाळ, ह.भ.प. सिद्धेश्वर महाराज काळे,
ह.भ.प. घनवट महाराज
व तबल्याची उत्कृष्ट अशी साथ
ह.भ.प. जगन्नाथ महाराज कराळे यांची मिळाली तसेच साऊंड सिस्टीम कवचट महाराज बोरदेवी यांची मिळाली,
कथेच्या शेवटी यजमान सौ मंगल ताई रामेश्वर खळगे यांच्या हस्ते आरती झाली आरती नंतर ह भ प जानकीराम जी घाटूळ साहेब यांच्या सुमधुर वाणीतून पसायदान झाले.








