मोमीन पुरा दायरा रोड बीड येथील जनतेचे आरोग्य धोक्यात-अॅड शेख फेरोज

Beed

(बीड प्रसार न्युज)

मोमीन पुरा दायरा रोड येथे मागील दीड महिन्या पासून येथील नाल्याची साफ सफाई करण्यात आलेली नसून इथे मागील कित्येक दिवसापासून कचरा उचलण्या साठी घंटा गाडी देखील आलेली नाही.सद्या संपूर्ण जग हे कोरोना महामारीच्या विळख्यातुन जात आहे अद्याप तरी बीड जिल्ह्यात एक ही कोरोना रुग्ण सापडलेला नाही.परंतु आपला परीसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे.

सध्या मुस्लिम समाजाचे पवित्र रमझान महिना सुरू झाला असून येथील नाल्या साफ सफाई करण्यात न आल्या मूळे सदरील नाल्या मधील पाणी हे रस्त्या वर येऊन सर्वत्र घाण झाली आहे.व नाल्या साफ न केल्या मूळे ब्लॉक होऊन त्या मधील पाणी जागच्या जागी जमा होउन सर्वत्र घाण वास सुटलेला आहे व कित्येक दिवसापासून   येथे कचरा उचलण्या साठी घंटा गाडी आलेली नाही त्यामुळे बीड नगर परिषदचे मुख्याधिकारी साहेबांनी त्वरित प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर येथील नाल्या साफ सफाई करण्याचे आदेश करावे.

Sharing

Visitor Counter