बीड नंतर गेवराईतही लाॅकडाउन दुपारच्या नंतर पाच वाजता कडकडीत बंद केला व्यापार्यांनी दिला प्रतिसाद!

Beed

बीड नंतर गेवराईतही लाॅकडाउन दुपारच्या नंतर पाच वाजता कडकडीत बंद केला व्यापार्यांनी दिला प्रतिसाद!

गेवराई/प्रतिनिधी

कोरोना विषाणु चा वाढता प्रभाव लक्षात घेता बीड च्या जिल्हाधिकाऱ्यांनी बीड शहर सात दिवसांसाठी पुर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे बीडमध्ये स्वत: जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी रस्त्यावर उतरत लाॅकडाऊनचे नियम लोकांना समजावून सांगितले.बीड पाठोपाठ गेवराईतही सायंकाळी पाच नंतर आत्यावश्यक सेवा वगळता पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय मुख्याधीकारी व पोलीस प्रशासनाने घेतला आहे.सायंकाळी पाच नंतर जो व्यापारी प्रशासनाचे नियम पाळणार नाही त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल अशा इशारा देखील देण्यात आला आहे यावेळी मुख्याधिकारी बिघोत पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे सह राजाराम तडवी , मनिषा जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Sharing

Visitor Counter