जयेश भाऊ अहिरे युवा मंच व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकार्याकडुन चहा व नाशट्याची सोय.

दिनांक ३० /०३/२०२०.
आपल्या भारत देशात कोरोना आजाराचे मोठे संकट ओडून आले आहे या सर्व गोष्टींची दक्षता घेत पोलीस यंत्रणा नियंत्रण करत आहेत. तसेच सामाजिक बांधली की म्हणून पोलिसांना व तसेच गोरगरीब जनतेला मदत करताना लाखो हात दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन आपली भुमिका पार पाडताना दिसत आहे व पोलिस प्रशासनाचे मनोबळ वाढविण्यासाठी आज याठिकाणी चहा, पोहे,पाणी बॉटल चे नियोजन जयेश भाऊ अहिरे युवा मंच व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी यानी केली.
नाशट्याची सोय करताना पोलिसांनी देखील सहकार्य केले तसेच आभार देखील मानले येत्या तीन ते चार दिवसात जयेश भाऊ अहिरे मित्र परिवारातर्फे पोलिस बांधवांना व गोरगरीब जनतेला मसालेभात वाटपाचे आयोजन करण्यात येणार आहे.
जयेश भाऊ अहिरे युवा मंच व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी सौ.सविताताई कुलकर्णी व तसेच , सौ.आदिती ताई कुंभोजकर , व अतुल भाऊ बाळकृष्ण कुंभोजकर, शशिकांत वाघमारे, सुशांत पवार, जय ईश्वर आहिरे, मधुकर काका वैराट , अमित सिंग भैया, विकास भारती. इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यामध्ये कोणाला सामाजिक बांधिलकी म्हणून कोणाला मदत करावयाची असल्यास त्यांनी जयेश भाऊ अहिरे यांच्याशी संपर्क साधावा ही नम्र विनंती.
