कामगारांना स्वस्त धान्य वाटप कर - शेख सादी

Beed

माजलगाव/प्रतिनिधी

माजलगाव तालुक्यातील हातावर पोट असणाऱ्या मजूर कामगारांचा लाॅकडाउन मुळे उपासमारीची वेळ आलेली असून आज अनेक कुटुंबांचे प्रमुख व पालन-पोषण करण्याचीदेखील परिस्थिती नाही.शासन कडून काही मजुरांना बेकारी भत्ता दोन हजार रुपये केला असला तरीही एवढ्या मध्ये उपजीविका भागत नसल्याने जिल्हाधिकारी यांनी पुरवठा विभागाला सूचना करून प्रत्येक कुटुंबास ३५ किलो गहू व १५ किलो तांदूळ वाटप करून या मजुरांची होत असलेली उपासमार टाळावी. तसेच शहरी रिपेरिंग, गाळ उपसा, शासनाच्या कोट्यातून होणाऱ्या बांधकाम व इतर कामांमध्ये मजूर व कामगारांना समाविष्ट करून घेण्याबाबत आदेशित करावे अशी मागणी संघर्ष मजूर कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी केली आहे.

लाॅकडाउनच्या काळात अनेक कुटुंबांची व मजूर कामगारांचे अतोनात हाल होत असून कुठलाही मजूर कामगार अन्न व जीवनावश्यक वस्तू शिवाय उपाशी मरणार नाही याची काळजी घेणे शासनाची जबाबदारी असून राशन दुकानदारांना विशेष सूचना करून स्वतंत्र रीत्या मंजूर करून कामगारांना हे धान्य घरपोच वितरण करण्याची वेगळी व्यवस्था करावी असे ही त्यांनी म्हटले आहे.

Sharing

Visitor Counter