आष्टीतील प्रसिद्ध वकील बबनराव देशपांडे यांचे निधन
Ashti

आष्टीतील प्रसिद्ध वकील
बबनराव देशपांडे यांचे निधन
आष्टी/प्रतिनिधी.
बीड प्रसार न्युज.
आष्टी येथील जुन्या पिढीतील प्रसिद्ध वकील त्र्यंबक तथा बबनराव देशपांडे (वय ८५ वर्षे) यांचे आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आष्टी न्यायालयातील वकील अँड. श्रीकृष्ण देशपांडे यांचे ते वडील होत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये ते आयुष्यभर सक्रिय सहभागी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊनमधील शासकीय नियमांचे पालन करून खंडोबा मंदिराजवळील स्मशानभूमीत त्यांच्यावर आज दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
