आज पर्यंतचे २०४ पैकी २०४ अवाहल निगेटिव्ह-डाॅ.आशोक थोरात

Beed

आज पर्यंतचे २०४ पैकी २०४ अवाहल निगेटिव्ह-डाॅ.आशोक थोरात 

बीड/प्रतिनिधी 

राज्यात कोरोनाने पाय पसरलेले असले तरी बीड जिल्ह्यात मात्र कोरोना दाखल होवूनही त्याला बीड जिल्ह्यात आपले पाय रोवता आले नाही. म्हणूनच आज एकही संशयित सुध्दा जिल्ह्यात नसल्याने जनतेतून आरोग्य प्रशासनाचे आभार मानले जात आहेत. तर बीड जिल्ह्यात आतापर्यंत साडे बत्तीस हजार ऊसतोड मजूरांचे आगमन झाले असून त्यापैकी अनेक संशियतांचे नमूने निगेटिव्ह आले असल्याने आजही आपला जिल्हा सेफ आहे.

करोना लागण राज्यात झाल्यापासून बीड जिल्ह्यातील २०४ स्वॅब नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी सर्व नमुने निगेटिव्ह आलेले असून आज बीड जिल्ह्यात एकही संशयित नाही. आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील एक पॅझिटिव्ह रुग्ण होता. तो पण उपचार घेवून बरा झाला असल्याने आता मात्र बीड जिल्ह्यातील कोरोनाची दहशत कमी होत असली तरी ३ मे नंतरही सोशल डिस्टंन्स हे पथ्य पाळावेच लागेल. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी ही माहिती दिली असून नागरिकांनी व ग्रामस्थांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे गरजेचे आहे.

 

Sharing

Visitor Counter