सरकारी दरानुसार रेमडेसिवीर विक्री न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा :- ज्ञानेश्वर चौधरी

सरकारी दरानुसार रेमडेसिवीर विक्री न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा :- ज्ञानेश्वर चौधरी
कडा/प्रतिनिधी
सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यात दर दिवसाला हजाराच्या वर रुग्ण आढळत आहेत. त्यापैकी दररोज रुग्णांचा योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू होत आहेत.जिल्हाबरोबर प्रत्येक तालुक्यातील शासकीय रूग्णालयात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव झाल्यापासून रेमडेसिवीर नावाचे एक इंजेक्शन वापरण्यात आरोग्य यंत्रणांनी सुरुवात केली. यामुळे महाराष्ट्रातील कोरोना संख्या आटोक्यात येण्यात मदत होत आहे. काेरोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठी बऱ्याच औषधांचा वापर केला जात आहे. रेमडेसिवीरच्या उत्पादकांनी या औषधाची विक्री रुग्णालयांना तसेच अधिकृत विक्रेत्यांना ८०० ते १३०० रुपयेप्रमाणे करण्यात येत होती. म्हणजेच सरासरी १०४० रुपये या किमतीत याचा विक्री दर ठरविण्यात आला होता . अनेक महिन्यापासून रुग्णालये आणि रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना या औषधाची विक्री किंमत कमी करण्यात आली आहे. पण अनेक फार्मासिस्ट व खासगी रुग्णालयात रुग्णांकडून छापील किमतीनुसार आकारणी केली जात नाही, त्यामुळे ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड पडत आहे. अन्न व औषध प्रशासनाने त्यावर कार्यवाही करावी व एकच दर सार्वजनिक करून विक्रीचे आदेश द्यावेत. अशी मागणी शिवसंग्राम चे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे. जी खासगी रुग्णालये वा औषधी दुकाने साठेबाजी करत असतील व जादा दराने विक्री करत असतील, त्यांचे लायसेन्स रद्द करावे. तथा रेमडेसिवीर इंजेक्शनची साठेबाजी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, सामान्य जनतेची होत असलेली पिळवणूक थांबवावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी दिला आहे.