इंजिनिअरींग,पञकारीता,लाॅ, महाविद्यालयांनी फी आकरणे बंद करावे-अशोक ढगे

इंजिनिअरींग,पञकारीता,लाॅ, महाविद्यालयांनी फी आकरणे बंद करावे-अशोक ढगे
माजलगांव/प्रतिनिधी
बीड सह राज्यात व देशात कोवीड१९ची दूसरी लाट महाभयंकर असुन त्यात विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणीक नूकसान झालेले आहे.एकीकडे राज्य सरकार दहावी व बारावीच्या परिक्षा रद्द करत असून बीड जिल्ह्यातील मात्तबरांचे मोठमोठे संस्थाचालकांच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना फिस भरा म्हणून फोन ,मेसेज,व दिसेल त्या स्वरूपाद्वारे पालकांना कळवले जाते की,आपल्या पाल्याची अॅडमीशनफी,परीक्षा फी,थेरी फी,प्रॅक्टील फी,आदि अमूक तमुक फी आहे तात्काळ भरा असे आशयाचे फोन व मेसेज येतात.कोरोना मूळे सर्वच स्तरावर लोक कंगाल होउन बसले आहेत.लोकांना हताला कामे नाहीत.अन हे संस्थावाले विद्यार्थ्यांची व पालकांची पिळवणूक करत आहेत. त्या संस्था वाल्यानी आपल्या सबंधित स्टाफ ला सांगून सर्वाची फीस माफ करावी .बीड जिल्ह्यातील अध्यापक विद्यालये,इंजिनअरींग विद्यालये,पञकारीता विद्यालये,लाॅ विद्यालये, कृषि,आदी संस्थानी जर अशा महामारीत विद्यार्थ्याची व पालकांची हेळसांड करत असतील तर हे खपवून घेणार नाहीत.एक तर विद्यार्थ्याची शिष्यवृती देण्याचा पत्ता नाही म्हणे फीस भरा.वरील होणारी पिळवणूक थांबवली नाही तर विद्यार्थ्यांना सोबत घेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविद्यालय भिक मांगो अंदोलन करण्यात येईल असे प्रसिद्धीस दिलेल्या पञकान्वये संघर्ष प्रतिष्ठान चे अशोक ढगे ,माणिक अडागळे,रफीक शेख,नवनाथ साळवे,धम्मा गावडे,राहूल ढाकरगे,संजय लांडगे यांनी कळवले आहे.
