कोरोनावर मात करण्यासाठी मास्क आणि सामाजिक अंतर राखणे गरजेचे मनसे युवा नेते भागवत चौरे
Beed

कोरोनावर मात करण्यासाठी मास्क आणि सामाजिक अंतर राखणे गरजेचे मनसे युवा नेते भागवत चौरे
वडवणी प्रतिनिधी/दत्ता करडे
दि.28 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह संपूर्ण देश हादरून गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच वाढत्या रुग्णांवर नियंत्रण मिळवून मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली राज्यभरात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत.कोरोनाच्या या संकटात नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार सक्षमपणे कर्तव्य बजावत असून कोरोणावर मात करण्यासाठी नागरिकांनी मास्क आणि शारीरिक अंतर या नियमांचे पालन करावे व आपल्या आरोग्याची काळजी करावी अशी विनंती मनसे सदस्य भागवत चौरे यांनी केले आहे.
