सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकसहभागातून  स्वच्छता मोहीम

Beed

सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकसहभागातून  स्वच्छता मोहीम    

आष्टी/प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज लोकसहभागातून साफसफाई मोहीम राबविण्यात आली.   अधिक माहिती अशी की,प्रा आ केंद्रची  ईमारत फार जुनी झाली असून परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते.प्रा आ केंद्र अंतर्गत 43 गावांचा समावेश असल्याने रुग्णांची नेहमी गर्दी असते तसेच सध्या कोरोना लसिकरण व एंटीजेन तपासणी होत असल्याने येणारे नागरिक जिथे सावली व स्वछता असेल तिथे बसत होते.त्या मुळे सोशल डिस्टन्स चा फज्जा उडत असे.ईमारत जुनी असल्याने महिला व पुरुषांना मुतारीची सोय दवाखान्यात नव्हती.अशा बऱ्याच समस्या होत्या.त्यामुळे गावातील युवकांनी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी संयुक्त स्वच्छता मोहीम राबवून परिसरातील काट्या वीटा दगड कचरा  घाण काढून परिसर स्वच्छ केला.बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली.लसिकरण व एंटीजन साठी येणार्यांना सोशल डिस्टन्स मध्ये उभे राहता यावे यासाठी फक्की टाकून योग्य नियोजन केले.एका बाजूला वाहन पार्किंगची व्यवस्था केली आहे.तसेच महिलांना व पुरुषांना मुतारीची सोय करून दिली.यामुळे दवाखान्यात रुग्णांना येणाऱ्या बऱ्याच अड़चनीचे समाधान झाले आहे.ही स्वच्छता मोहीम वैद्यकीय अधिकारी डॉ नितिन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.या स्वच्छता मोहिमेत सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके युवासेना नेते दिपक दादा डहाळे आरोग्य कर्मचारी पंडित घोडके पवळ एस एस तसेच गावातील भीमराव भादवे रवि शिंदे राजू भादवे इत्यादींनी सहभाग घेतला.

Sharing

Visitor Counter