कापुस खरेदी केंद्रावर शेतकर्यांची पिळवणुक - शेख जुनेद

कापुस खरेदी केंद्रावर शेतकर्यांची पिळवणुक - शेख जुनेद
गेवराई/प्रतिनीधी
सध्या लॉक डाऊन सुरू असले तरी कापूस खरेदी विक्रीला परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र जिनिंग चालक कापूस खरेदी करत असताना अनेक अटी व शर्ती घालु लागले. खराब कापूस असल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांचा कापूस कमी भावात घेऊ लागले. तर काही जिनिंग चालक कापूस घेण्यास नकार देऊ लागले. अनेक जिनिंग चालकांनी जिनिंग वरून शेतकऱ्यांचा कापूस परत पाठविला आश्या प्रकरणावरून संबंधीता विरोधात कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे. व सरसकट कापून घेण्याची मागणी करण्यात येऊ लागली आहे. लाँकडाऊन आसल्यामुळे 30 ते 35 टक्के शेतकऱ्यांचा कापूस घरीच आहे. काही दिवसापासून कापूस खरेदी विक्रीला मंजुरी देण्यात आली त्यामुळे शेतकरी जिनिंगवर कापूस विक्री करु लागले मात्र जिनिंग चालक शेतकऱ्यांचा कापूस घेण्यास टाळाटाळ करू लागले.कापूस खराब असल्याचे कारण सांगून कापूस अत्यंत कमी भावात घेऊ लागले.हाच कापुस व्यापाऱ्यांचा मात्र घेतला जाऊ लागला. व्यापारी आणि ग्रीडरमध्ये मिलीभगत असल्याने व्यापार्यांच्या कापसाला सूट दिली जात आहे.अनेक जिनिंगवर शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी कापूस आणल्यानंतर त्याची पाहणी ग्रिडर करतात . आणि त्यात थोडी कवडी असली की तो कापूस घेतला जात नाही कापूस खरेदी करण्याच्या सूचना प्रशासनाच्या असतानाही ग्रिडर मनमानीपणा करू लागले. पाठीमागचा कापूस थोडा खराब असतोच.थोडा खराब असणारा कापूस सगळंच नाकारणे योग्य आहे का? कापूस विक्रीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना जिनिंग चालकाशी वादावादी करण्याची वेळ येत आहे. त्यासाठी जिनिंग चालकांनी व ग्रिंडरानी शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा. आधीच शेतकरी वेगवेगळ्या संकटामध्ये घेरलेला आहे.त्यांना त्रास देण्याचे काम जिनिंगवाल्यांनी करू नये.।
