उघडा डोळे पहा नीट सौ . साक्षी भारत हांगे

उघडा डोळे पहा नीट सौ . साक्षी भारत हांगे
बीड/वार्ताहर
उघडा डोळे पहा नीट सौ . साक्षी भारत हांगे
काल-परवा एका वृत्तपत्रामध्ये एक बातमी छापून आली होती. त्यात त्यांचं म्हणणं होतं मेटे साहेबांनी समाजाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला.ती बातमी वाचून ज्यांनी कुणी लिहिली आहे त्याला अपूर्ण माहिती आहे. किंवा माहिती देणाऱ्याने चुकीची माहिती पुरवली असावी. नाहीतर मेटे साहेबांची राजकीय आकसापोटी बदनामी करण्याचा उद्देश असावा असंच वाटतं. मेटे साहेब विधान परिषदेत नसते तर मराठा समाजासाठी हे झालंच नसतं ...
मराठा समाजातील बेरोजगार तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. त्या माध्यमातून हजारो सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय सुरू करता आला .शिक्षणासाठी मराठा समाजातील गरीब होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सार्थी सारखी संस्था शासनाला स्थापन करायला लावून त्यातून हजारो विद्यार्थ्यांची यूपीएससी एमपीएससीसाठीची दारे खुली करून दिली .या संस्थेच्या माध्यमातून गरजवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली .बीडमध्ये मराठा समाजातील गरीब मुलांसाठी 200 मुलांचे वसतिगृह सुरू केले. मराठा आरक्षणासाठी लढा उभारला ते मिळवून दिलं .आज जरी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले असले तरी याला जबाबदार महाराष्ट्रातील राज्य शासनच आहे .ज्यावेळेस मराठा आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलत तेव्हापासून मेटे साहेब जीव तोडून सांगत होते राज्यशासन मराठा आरक्षणाच्या बाजूने आपले मत सक्षम पणे मांडत नाही. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा .त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री निवास स्थान समोर निदर्शन केले, जालना ,नांदेड येथे मेळावा घेतला, आंदोलन केली ,सर्व हातावर हात ठेवून गप्प बसले असताना एकटे मेटे साहेबच लढत होते .बाकी सर्व मराठा नेत्यांनी बघ्याची भूमिका घेतली. कारण त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी इतरांचा रोष नको आहे .त्यांना त्यांची वोट बँक नाराज करायची नाही.
मेटे साहेब भाजपसोबत गेले ते काय आमदारकी मिळवण्यासाठी गेले नव्हते. त्यांनी जाहीरपणे सांगितलं होते गेली 15 वर्ष आघाडी सरकार असून मराठा आरक्षण संदर्भात कोणतीच ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे जो पक्ष यापुढे मराठा आरक्षण देईल त्याच्यासोबतच आम्ही काम करू. त्यानंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब, नितीन गडकरी ,देवेंद्र फडणीस त्यावेळचा महायुतीतील घटक पक्ष शिवसेना यांनी तसा शब्द दिल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारकीचा मेटे साहेब यांनी राजीनामा दिला. आमदारकीला चिटकून बसले नाहीत. पुढे भविष्यात सत्ता येणार आहे का नाही हे माहीत नसताना आमदारकीचा राजीनामा देऊन महायुतीत सामील झाले .पुढे महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं. त्या आरक्षणाविरोधात काही जण कोर्टात गेले .कोर्टातही आरक्षणाच्या बाजूने भक्कम रीतीने पाठपुरावा करून आरक्षण टीकवल. पुढे याचिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात नेहला. इकडे महाराष्ट्रात सत्ताबदल झाला आणि मराठा आरक्षणाला खरी घरघर तिथून सुरू झाली. ऐन वेळेला वकील बदल, कागदपत्रांची अपूर्ती, असं खूप काही घडलं .या वसुली सरकारचं मराठा आरक्षणाच्या संदर्भात कसलंच गांभीर्य नव्हतं. आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. आता बोट दुसऱ्याकडे दाखवून मोकळे आहेत.
तसेच शिवस्मारकाच्या बाबतीत ही काही लोक मेटे साहेबांच्या डोक्यावर खापर फोडून मोकळे आहेत.
त्यांना त्यातली वस्तुस्थितीच माहित नाही. समुद्रात स्मारक उभारायचं म्हणजे गेलं की काम चालू करायचं असं नसतं. अनेक विभागाच्या परवानग्या लागतात. त्यासाठी तेथील हवामानाचा अभ्यास करावा लागतो, समुद्रतळाच्या खडकांचा अभ्यास करावा ,लागतो प्रयोगशाळेत परीक्षण करावे लागते ,वाऱ्याच्या वेगाचा तीन-चार वर्ष अभ्यास करावा लागतो, समुद्राच्या लाटांचा वेग ,भरती ओहटी यांचा अभ्यास करावा लागतो. आणि त्यानंतर सर्व पोषक अहवाल मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होत असते .एवढा सारा खटाटोप सुरु असतानाच कुठल्यातरी पर्यावरण प्रेमी (विघ्नसंतोषी )ने शिवस्मारक का विरोधात न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवली. त्यात मेटे साहेबांचे काय दोष. सत्ताबदल झाल्यापासून राज्य शासनाची शिवस्मारक का बद्दलची उदासीनता पाहता स्वाभिमानाने शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
लोकशाहीत प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य असले तरी खरे आणि वास्तव मांडावेत राजकीय आकसापोटी मांडण्यात काहीच अर्थ नाही. जो माणूस समाज कार्यातही सदैव तत्पर आणि पुढे असतो दुष्काळाच्या काळात पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम राबवली . अनेक गाव पाणीदार केली .
कोरोना काळात सगळे नेते मंडळी घरात बसले असताना लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवला .आणि सर्वात प्रथम सर्व सोयींनी युक्त 200 खाटांचे कोरोना केअर सेंटर सुरू केले .
मेटे साहेब नफ्यात अन् समाज तोट्यात म्हणणाऱ्यांनो आमदारकीच्या जीवावर इतरांसारखं मेटे साहेबांनी शंभर-सव्वाशे खाजगी शैक्षणिक संस्था, पंधरा-वीस बँका ,दोनशे एकर जमीन खरेदी ,चार पाच खाजगी साखर कारखाने तर सुरू केले नाहीत ना ?विधान परिषदेत साहेब आहेत म्हणून तरी काही प्रमाणात समाजाला न्याय मिळतो आहे ."उचलली जीभ लावली टाळ्याला सोप असतं". पण अनेक स्वप्नवत असणाऱ्या गोष्टींना कुठेतरी साहेबांच्या प्रयत्नामुळे पाया तरी रचला जात आहे .याचा सर्वांना सार्थ अभिमान असला पाहिजे . ज्याप्रमाणे कोणी कितीही तळहाताने सूर्य झाकण्याचा प्रयत्न केला तरी झाकत नाही. तसं कुणाचं कर्तुत्व आणि काम कितीही उलट सुलट लिहून छापलं तरी झाकत नाही.
