भाजीपाला भेटत नसल्याने नागरिकांची चिड-चिड !

Beed

भाजीपाला भेटत नसल्याने नागरिकांची होते गैरसोय !

बीड/प्रतिनिधी 
कृषी विभागामार्फत शहरासाठी ८४ प्रभागात पास वितरण करण्यात आलेले आहेत पूर्ण शहरात भाजीपाला विक्री करताना परवान धारके दिसत नाहीत व भाजीपाला न भेटल्याने नागरिकांची गैरसोय होताना दिसत आहे. 

जिल्हाअधिकारी साहेबांनी सर्व स्तरावर परवानाधारकावर योग्य ती कारवाई करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करावी नसता हात गाळेधारकांना परवानगी देऊन व्यापार करण्याची मुभा द्यावी. शहरातील समस्या दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या सोशल डिस्टन्सचे नियम हात गाळेधारकांना लावून त्यांना व्यापार करण्याची मुभा देण्यात यावी व सध्याची परिस्थिती आशी आहे  शहरात  काही अशी ठिकाणं आहेत जिथे भाजीपाला पोचत नाहीये.

सध्याची परिस्थिती अशी आहे की कृषी विभागाचे व नगर परिषदेचे कर्मचारी हे फक्त मालगाडी धरण्यात,शेतकऱ्यांच्या भाजीपाला धरण्यात,व्यापाऱ्यांचा माल फेकण्यात यातच ते मग्न आहेत हे बघना गेलेत कोण कोणत्या भागामध्ये भाजीपाला भेटतो कोणत्या भागामध्ये भेटत नाही.

शेतकऱ्यांना शहरात फिरता येत नाही जेवढे परवानाधारक दिले काही परवाने शेतकरी गटांना देण्यात आलेले आहेत.पण सर्व परवाने देण्यात आलेले आहे  परवाने संबंधित परवाना घेऊन शेतकरी हा आपल्या गावीच आहे ते शहरात काही येत नाही आणि कोणत्या भागात फिरत नाही काही का जर असेच राहिले तर लोकांना मानसिक त्रास झाल्याशिवाय राहणार नाही.जिल्हा अधिकार्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

Sharing

Visitor Counter