जिल्हाधिकारी साहेब किराणासाठी ऑनलाईन पद्धत योग्य नाही याचा फेरविचार करावा- शेख जावेद (सामान्य नागरिक)

Georai

जिल्हाधिकारी साहेब किराणासाठी ऑनलाईन पद्धत योग्य नाही याचा फेरविचार करावा- शेख जावेद (सामान्य नागरिक)

गेवराई/प्रतिनिधी

आपन जनतेच्या हितासाठी आज पर्यंत जे निर्णय घेतले ते जनतेने सिवकारले कारण ते जनतेच्या हितासाठी आहे.हे पण निर्णय जनतेच्या हितासाठीच आहे परंतु आपन जे किराणा सामानसाठी निर्णय घेतले त्या वर पूर्ण विचार करवा

कारण कित्येक गोरगरीब लोकांकडे  स्मार्ट फोन नाही व  ज्यांच्या कडे आहे त्यांना लिहता वाचता येत नाही मग आशा लोकांनी काय करायचा?  असा प्रश्न लोकांना निर्माण होत असल्याने नागरीकाला त्रास होत आहे.

गोरगरीब लोक किराणा सामान किलो दोन किलो घेत नही अर्धकिलो किंवा पावशेर घेत असतो त्यासाठी किराणा दुकानदार घरपोच सेवा देईल का?त्याला ते पुरेल का?त्यानी जर अगाऊ पैसे घेतले तर? एक तर या आगोदर किराणा दुकानदार  होमडिलीवरी चार्जेस ज्यास्त घेताना दिसतात.जर घरपोच सेवा त्यांनी दिली तर ते किती पैसे आगाऊ घेतील असा विचार आम नागरीक करत आहे.

पहिलेच दीड दोन महिण्यापासून लॉकडाउन असल्यामुळे जनतेचे हाल होत आहेत जर किराणा ऑनलाइन पद्धतीने झालं तर गोर गरीब,कष्टकरी जनतेचे हाल होताना दिसेल.

आपणास विनंती आहे की ऑनलाईन किराणा सामान खरेदीच्या
निर्णयाला एकदा फेर विचार करावा.

Sharing

Visitor Counter