धारुर शहरात स्वस्तधान्य दुकानदारांचा भोंगडा कारोबार!

धारुर शहरात स्वस्तधान्य दुकानदारांचा भोंगडा कारोबार!
किल्लेधारुर/प्रतिनीधी
धारुर शहरातील स्वस्त धान्य दुकानदार गहू व तांदळाची चड्या भावाने विक्री करत असुन या गंभीर बाबीकडे प्नशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
प्रशासनाच्या नियमानुसार गहू 2 रुपये किलो व तांदूळ 3 रुपये किलो असे भावाने लाभार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे परंतु धारूर शहरातील बरेच स्वस्त धान्य दुकानदार गहू तीन रुपये किलो व तांदूळ चार रुपये किलो प्रमाणे विकत आहेत यातून गोरगरीब लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात लूट होत आहे.कोरोना विषाणुचा प्रादुर्भावामुळे या संकटात गोरगरिब चागंलाच सापडला आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी असताना धान्य वाटपात गैरप्रकार दिसून येते आहे.आज धारुर शहरात असा प्रकार दिसून आला आहे.राशन दुकानदार कमी धान्य देऊन जास्त पैसे घेतल्याचे लाभार्थी सांगत आहेत.या गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष देऊन धान्य वाटपातला गैरप्रकार थांबवावा. असे धारुर शहरातील नागरिकांचे म्हणने आहे.
