बीड जिल्ह्याचा जिरो कायम-डाॅ.आशोक थोरात

बीड जिल्ह्याचा जिरो कायम-डाॅ.आशोक थोरात
बीड/प्रतिनिधी
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपली चांगलीच भूमिका बजावताना दिसते आहे यामुळेच आज पर्यंत बीड जिल्ह्याचा जिरो अजून कायमच आहे व बीड जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष अधिकार्यामुळे जिरोच राहील अशी अपेक्षा सर्वांना आहे.
शनिवारी पाठवलेले बीड जिल्ह्यातील आव्हाल 23 जणांचे निगेटिव्ह आलेले असून आज रविवारी (दि.१०) सकाळी ११ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणी ला पाठवण्यात आलेले आहे.
बीड जिल्हा सामान्य रुग्णालय विलगीकरण कक्षातून ९ तर केज उपजिल्हा रुग्णालयातून दोन जणांची स्वॅब तपासणीला गेलेले आहेत असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी सांगितले. यांनी सांगितले या दरम्यान शनिवार पर्यंत जिल्ह्यात एकूण ३१९ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत आजच्या ११स्वॅबचा अहवाल सायंकाळपर्यंत प्राप्त होऊ शकतो.
घरी राहा !सुरक्षित रहा!!
