माझ्या घरात होती,मूर्ती करूण आई सूर्यासमान भासे-मीनाक्षी किलावत

Beed

माझ्या घरात होती..मूर्ती करूण आई 
सूर्यासमान भासे..साऱ्या नभात  आई... 

नियमानुसार होतो सूर्यास्त सांजवेळी
दिनरात कष्ट करुनी राही ऋणात आई..

पाहत असेल बहुधा त्रागा तिची परीक्षा  
खंबीर पाय टाकत चाले उन्हात आई...

ह्रदयात आठवांची भरती अनेक वेळा
डोळ्यात आस भरुनी रमते कुळात आई..

उसना उजेड कोणा मागत नसे कधीही
होती तशीच आहे सगळ्या युगात आई..

काळानुसार गेल्या..बदलत पिढ्या कश्या बघ 
सोडून लोक जाती.. वृद्धाश्रमात आई ...

सगळा तुझ्या मुळे हा दुनियेत बोलबाला 
जगलीत माणसे ही तुझिया दुधात आई...

ममता बरीच केली.. झोळीत काय पडले ?
कोमेजली फुले ही.. ठेवी उरात आई

दाही दिशांस बघ ना.. भटकून राहिले मी 
या उंबऱ्यात मजला जागा तुझ्यात आई..

©मीनाक्षी किलावत
8888029763

Sharing

Visitor Counter