भाजपच्या वतिने जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन; खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांना अटक!

भाजपच्या वतिने जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन;
खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांना अटक!
बीड/वार्ताहर
ओबीसी समाजाला आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यात यावा तसेच ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण राज्य सरकार ने दिलेच पाहिजे यासाठी परळी वैजनाथ येथे भाजप च्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी असंख्य कार्यकर्ते , पदाधिकारी यांनी जिल्हाभरातील चक्काजाम आंदोलन पुकारले आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे . ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात १ हजार ठिकाणी भाजपकडून २६ जून अर्थात आज शनिवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय . त्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.
जिल्हाभरातील भाजप च्या नेत्यांकडून मुख्य रस्त्यावरील चौका-चौकात भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन मोठ्या संख्येत उपस्थित राहुन चक्काजाम आंदोलन पार पाडले आहेत.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुण्यात चक्काजाम केल्यानंतर परळीमध्ये देखील खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत चक्काजाम देखील आंदोलन सुरू होते .मात्र, थोड्याच वेळापूर्वी प्रीतम मुंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.