मेटे साहेबांच्या पश्चात त्यांचे स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी ज्योतीताईंनी आणि शिवसंग्रामने उचलली-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Beed

मेटे साहेबांच्या पश्चात त्यांचे स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी ज्योतीताईंनी आणि शिवसंग्रामने उचलली-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड/प्रतिनिधी

शिवसंग्रामचे अध्यक्ष स्व. विनायकराव मेटे यांनी व्यसनमुक्ती आणि मराठा आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू असे आश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दिवंगत विनायकराव मेटे साहेबांनी संपूर्ण जीवन समाजासाठी दिलं. राजकारणापेक्षाही समाजकारण त्यांनी अधिक केलं. मराठा आरक्षण, शिवस्मारक या स्वप्नपूर्तीसाठी ताकदीने उभे राहू असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

स्व. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण आणि शिवस्मारकासाठी सातत्याने पुढाकार घेवुन काम केले. मेटे साहेब राजकारणापेक्षा समाजकारणात सक्रीय आणि समाजोपयोगी कार्यक्रमात अग्रेसर असायचे, आज त्यांची कमतरता भासत आहे. मेटे साहेबांच्या पश्चात त्यांचे स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी ज्योतीताईंनी आणि शिवसंग्रामने उचलली आहे.  

बीड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजीक न्याय भवन येथे आयोजीत आण्णासाहेब पाटील प्रतिष्ठाणच्या व्यसनमुक्ती रॅलीच्या समारोप प्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, पालकमंत्री ना. अतुल सावे, आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, ज्योतीताई मेटे, तानाजीराव शिंदे, राजन घाग, माजी आ. भिमराव धोंडे, अक्षय मुंदडा, रमेश आडसकर, प्रभाकर कोलंगडे, भानुदास जाधव, नारायण काशिद, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, कुंडलिक खांडे, रमेश पोकळे, आशुतोष मेटे, रामहारी मेटे, अनिल घुमरे, सुहास पाटील, मनोज जाधव, राहुल मस्के आदिंची उपस्थिती होती.

Sharing

Visitor Counter