."वृक्षवल्ली आम्हा सोयरे" वनचरे या विचाराने प्रेरित होवून सामाजिक कार्याला सुरुवात

Beed

अग्रणी पाणी फाऊंडेशन निसर्गाची निस्वार्थ सेवा

"वृक्षवल्ली आम्हा सोयरे" वनचरे या विचाराने प्रेरित होवून सामाजिक कार्याला सुरुवात

औरंगाबाद/सिद्धांत कांबळे

 अग्रण धुळगाव ता.कवठेमहांकाळ जि.सांगली. येथील अग्रणी फाऊंडेशन चा वर्धापन दिन वृक्षरोपण निसर्ग समतोलाची शपथ घेवून साजरा  करण्यात आला...गावातील ध्येयवादी तरुण फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष शिवदास भोसले यांनी गावातील युवकांना एकत्रित आणण्यासाठी अग्रणी फाऊंडेशन या नावाचे एक रोपटे ४ वर्षापूर्वी लावले याचेच आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे, निस्वार्थ सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या युवकांचे कार्य वाखण्याजोगे आहे.तरुण पिढी मोबाईल भौतिक साधने सोडून निसर्गाकडे आकर्षित होत आहे हेच या  सामाजिक कार्याचे फलित आहे. ."वृक्षवल्ली आम्हा सोयरे" वनचरे या विचाराने प्रेरित होवून सामाजिक कार्याला सुरुवात केली.ब्रीदवाक्य सुरवात स्वतापासून अंगीकारून शिवदास भोसले,विशाल देशमुख,सुरेश सुतार,हेमंत खंडागळे,अतुल शेश्वरे काही हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच तरून या कार्यात सहभागी झाले होते.आज या सामाजिक कार्याची जाणीव जाग्रती झाल्यामुळे सगळे गाव आता प्रवाहात सामील झाले आहे.एकच लक्ष हरित अग्रण धुळगाव चे वटवृक्ष हे हरितमय गाव हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कामाला लागले आहेत.आतापर्यंत वड,पिपळ,पिपर्णी,लिंब अशा देशी ३१ प्रकारच्या २५०० झाडांचे निसर्गाचे देणे समजून निस्वार्थ भावनेने वृक्षारोपण व संगोपन केले आहे.गावातील शाळाच्या समोर मोकळ्या जागा रस्त्याच्या कडेला मंदिरासमोरील जागा ज्या ज्या ठिकाणी झाड लावता येईल.तिथे झाडे लावली जात आहे.फक्त झाडे लावली जात नाहीत.तर लावलेल्या झाडांचे पालनपोषण करण्याची जबाबदारीची ही पार पाडत आहेत.झाडामुळे गावातील वातावरण शुध्द होणार आहे.झाडामुळे पाऊस पडणार आहे.झाडे आपल्याला आॅक्सीजन देण्याचे काम करतात.या विचारांची जाणिव झाली आहे.गावातील दानशूर व्यक्ती पुढे येवून या तरुणांना आर्थिक हातभार लावत  आहेत.गावातील महिला पुरुष व शाळेत शिक्षण घेणारी मुले सुध्दा या सामाजिक मोहिमेत सामील होत आहेत. मानवी जीवनासाठी झाडे आवश्यक आहेत.ही जाणिव झाल्यामुळे गावातील लग्न समारंभात वाढदिवसाच्या समारंभात वृक्षभेट देण्यात येतात.आतापर्यत लग्न समारंभात शेकडो आंब्याची झाडे भेट दिली आहेत.भेट दिलेल्या व्यक्तीला वृक्षारोपण करून झाडांचे पालनपोषण व संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. अग्रणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावात जागोजागी पाणपोई ची सोय करण्यात आली आहे.या फाऊंडेशन मार्फत  वार्षिक गुणिजनांचा पारितोषिक देवून सत्कार करण्यात येतो.तसेच या फाउंडेशन मार्फत गावात महिला सबलीकरण आणि जनजागृती करीता विविध कार्यक्रमात घेण्यात येतात.अग्रणी फाऊंडेशन मार्फत स्मस्ती योजना राबविण्यात येते.यात गावातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर व्यक्ती चर्या स्मारणार्थ वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेवून लावलेल्या वृक्षांचे संवर्धन संगोपनासाठी सांगितले जाते.तसेत पक्ष्यांच्या साठी मुठभर धान्य घोटभर पाणी या संकल्पनेचा माध्यमातून घराच्या वरती टेरीस वरती जवळच्या झाडांच्या वरती धान्य व पाण्याची व्यवस्था केली आहे.पाणी आडवा पाणी जिरवा,महिला सबलीकरण,अनाथांना,गोर गरिबांना मायेचा आधार अशा अनेक विभागात कार्य चालू आहे, .माझे गाव हरितमय करण्यासाठी करण्यासाठी आणि पाणिदार करण्यासाठी निघालेल्या माझ्या सगळ्या तरुणांना मानाचा सलाम.अग्रण धुळगाव लवकरच पाणीदार आणि हरितमय होवो अशी शुभेच्छा देतो.

सुधीर शेश्वरे मार्गदर्शक आधारस्तंभ
अग्रणी फाऊंडेशन अग्रण धुळगाव 

Sharing

Visitor Counter