अनाथ,निराधार, विधवा महीलांना अन्नदान, धान्ये ,वाटप करून कविताने अनाथ,निराधारांच्या मदतीत शोधली मायेची साऊली

Beed

अनाथ,निराधार, विधवा महीलांना अन्नदान, धान्ये ,वाटप करून कविताने अनाथ,निराधारांच्या मदतीत शोधली मायेची साऊली

शासकीय बंधन आणि सामाजिक उत्तरदायित्व अशा दोन्ही बाजू सांभाळून घेत अन्नदान

औरंगाबाद/सिद्धांत कांबळे. वाळूजमहानगर 

आम्ही समाजाचे देणं लागतो आहोत, या उद्दात्त हेतूने प्रा.बी.जी.गायकवाड आणि सौ.कविता गायकवाड अविरत सामाजिक बांधिलकीत सातत्याने अग्रेसर असतात . देशात लाँकङाऊन सुरू झालेल्या पासून वाळूजमहानगर परिसरातील वाळूज,राजणगांव, तिसगांव,वङगांव, वळदगांव,पंढरपूर ,साजापूर, करोङी, आदी भागातील अनाथ,विधवा, गोरगरीब,विधवा महीला, मजूर,बेकार ,हातावर पोट असणाऱ्यानां अन्नदान करीत असतानाचं कविता गायकवाड याच्या मातोश्री कालकथित पार्वती हरचंद निकम हया अचानक(दि.२)रोजी आपल्यातून गेल्या. त्यानंतर देशात कोरोना संसर्गजन्य आजाराने सगळीकडे लाँकङाऊन असल्याने कविता गायकवाड यांनी अनाथ,निराधार, विधवा महीलांना अन्नदान, धान्ये ,वाटप करून मायेची साऊली शोधण्याचा प्रयत्न केला आहे . शास्त्रीय आणि धार्मिक नियमानुसार आई गेल्यानंतर कविता गायकवाड यांनी गावी (जळगांव)या ठिकाणी जाणे महत्त्वाचे आहे .माञ, शासकीय बंधन आणि सामाजिक उत्तरदायित्व अशा दोन्ही बाजू सांभाळून घेत अन्नदान करून लाँकङाऊन काळात आपल्या आईनं केलेले संस्कार, सामाजिकता, एकात्मता, भावनिकता, परिवर्तनशीलता, अशा  नैतिक मूल्यांची जोपासना करीत वाळूजमहानगरातील असंख्य गरजू, मजूर ,अनाथ,विधवा महिलांना मदत करून आपल्या आईच्या मायेची सावली घेतली आहे .यांच्यातील मदतीला प्रा.बी.जी.गायकवाड ,संजय मंजूळे, प्रा.संजय काळे, मुख्यधयापक एल.ङी.हिवाळे,नरेंद्र ञिभूवन,सामाजिक कार्यकर्ते व्यंकट मैलापूरे,
संकल्प गायकवाड ,संस्कृती गायकवाड ,गणेश घुले , संकल्प शिक्षण संस्था ,वाळजमहानगर पञकार संघटना , मुफ्टा शिक्षक संघटना ,राजा शिवाजी शाळा,  आदीनी मदत कार्यात मोलाचा वाटा उचलला आहे .

Sharing

Visitor Counter