गेवराईच्या राशन माफिया अरुण मस्के अटक होणार का,नायब तहसीलदार चौकशीच्या फेऱ्यात!

Georai

गेवराईच्या राशन माफिया अरुण मस्के अटक होणार का,नायब तहसीलदार चौकशीच्या फेऱ्यात!

गेवराई/प्रतिनिधी 

भाजपचे आ लक्ष्मण पवार यांचे निकटवर्तीय अरुण मस्के यांच्या गोदामावर छापा मारून पोलिसांनी मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणात गोदामपाल याच्या अटकेनंतर नायब तहसीलदार भंडारी यांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी सुरू असून या सर्वांना राजाश्रय देणाऱ्या मेन राशन माफिया अरुण मस्के ला देखील लवकरच अटक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली .
               

भाजपचे कार्यकर्ते अरुन मस्के यांनी गोरगरिबांना वाटप करण्यासाठीचा गहू,तांदूळ आणि साखर काळयाबाजारात विक्रीसाठी गोदामात लपवून ठेवल्याचे प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणले, त्यानंतर मस्के फरार झाला ,दरम्यान पोलिसांनी मस्केच्या भावसह दोन गोदाम पाल ताब्यात घेतले .या सगळ्या प्रकरणात पुरवठा विभागातील अधिकारी सहभागी असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी नायब तहसिलदार भंडारी यांची देखील चौकशी करण्यात आली आहे,तब्बल दोन दिवस ही चौकशी करण्यात आली आहे .

दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोप अरुण मस्के आणि त्याला राजाश्रय देणारे दिग्गज यांच्या मुसक्या देखील लवकरच आवळल्या जाणार आहेत .

Sharing

Visitor Counter