डाॅ.पेशाला काळीमा फासणार्‍या स्वरूपसिंह हजारीला अटक करण्यासाठी माजलगावमध्ये जोडे व बोंब मारून निषेध

Beed

डाॅ.पेशाला काळीमा फासणार्‍या स्वरूपसिंह हजारीला अटक करण्यासाठी माजलगावमध्ये जोडे व बोंब मारून निषेध

माजलगांव/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील धारूर तालूक्यात एका खासगी हाॅस्पीटल मध्ये मागासवर्गीय महिला हि स्वताची सोनोग्राफी करावयास गेली तेंव्हा अशलिल वर्तूनूक करून धारूर  नगर परिषदचे नगराध्यक्ष स्वरूपसिंह हजारी ने विनयभंग केला दरम्यान त्याच्यावर गून्हा सूध्दा नोंद झाला असून अद्यापपर्यत आरोपी मोकाट आहे .त्याला कायद्याची चौकट माहित नसून  त्या चौकटीत बसवण्यासाठी लोकशाही मार्गाने प्रतिकात्मक फोटोस जोडे मारून बोंबा बोंब करून निषेध करण्यात आला.डाॅ.हजारीला तात्काळ अटक करण्यात यावी म्हणून माजलगाव येथील समाजबाधंवानी छञपती शिवाजी महाराज चौकात जोडे व बोंब मारून त्या लिंगपिसाट हजारीचा निषेध केला.जो पर्यत त्या नराधमाला अटक होत नाही तो पर्यत विविध स्वरूपाचे अंदोलने करण्यात येतील असे अंदोलनकर्ते यांचे म्हणने आहे. स्वरूपसिंह हजारीला लवकरात लवकर अटक केली नाही तर तिव्र स्वरुपाचे अंदोलन होतील. हे अंदोलन यशस्वी करण्यासाठी विवेक जाधव,अशोक ढगे,विक्रम वाघमारे,आकाश उकांडे  ने अथकपरिश्रम घेतले. या वेळी मच्छिंद्र उपाडे,राधे कांबळे,विराज आठवे,मूस्ताक कूरेशी, अनिल वाघमारे,आदित्य कांबळे,मोहन वैराळ,विकास वाघमारे,नाटकर,परमेश्वर चांदने,सदानंद लोखंडे,आजम कूरेश,आदेश क्षिरसागर,प्रशांत खंडागळे,प्रतिक क्षिरसागर,प्रविन मिसाळ,कृष्णा मिसाळ, तेजस वाघमारे, इतर बहूसंख्येने उपस्थीत होते.

Sharing

Visitor Counter