जालना जिल्ह्यातील कोरोनो पॉझिटिव्ह आढळलेली महिलेला आज झाली सुट्टी

जालना जिल्ह्यातील कोरोनो पॉझिटिव्ह आढळलेली महिलेला आज झाली सुट्टी
जालना/प्रतिनिधि
जालन्यात प्रथम शोरूम पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेला आज झाली सुट्टी जालना जिल्ह्यामध्ये पहिली कोरोनाबाधित आढळलेली दु:खीनगर येथील 65 वर्षीय महिला तसेच पारध (ता.भोकरदन) येथील तरुणीच्या स्वँबचा अहवाल निगेटिव्ह आल्याने रुग्णालयातून आज दिनांक 15 मे रोजी डॉक्टर व परिचारिकांनी टाळ्या वाजून पुष्पवृष्टी करत दोघींना निरोप दिला. या महिलांना पुढील 14 दिवस होम टाईम राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एम.के.राठोड यांनी दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एम.के.राठोड डॉ.म्हस्के, डॉ.जगताप, डॉ. सोळंके, डॉ.राठोड, डॉ.सर्वेश पाटील आदींची उपस्थिती होती. जालना शहरात सर्वप्रथम कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेली जुना जालना भागातील दुःखी नगर मधील 65 वर्षीय महिला पूर्णपणे तंदुरुस्त झाली असून या महिलेला तब्बल 40 दिवस करण्यात आलेल्या उपचारानंतर आज शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हा सरकारी रुग्णालयातून सन्मानपूर्वक सुट्टी देण्यात आली आहे.
