औरंगाबादमध्ये दोन कोरोनाबधितांचा मृत्यू : आत्तापर्यंत 34 बळी

औरंगाबादमध्ये दोन कोरोनाबधितांचा मृत्यू : आत्तापर्यंत 34 बळी
सोमवारी दीड तासाच्या अंतराने आणि दोघांचा मृत्यू झाला..
औरंगाबाद/प्रतिनिधी
कोरोनाबाधित पैठण गेट येथील 56 वर्षीय महिला व बुढ्ढीलेन येथील 42 वर्षीय पुरुषांचा सोमवारी दीड तासाच्या अंतराने मृत्यू झाला. आकडा 34 झाला , अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या माध्यम समन्वयक डॉ.अरविंद गायकवाड यांनी दिली.. पैठण गेट येथील 56 वर्षे महिलेला रविवारी घाटीत रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्या बांधित असल्याचा अहवाल रविवारी संध्याकाळी सहा वाजता प्राप्त झाला.तिव्र श्वसन विकार, मधुमेह व उच्चरक्तदाबा सोबत कोरोना झाल्याने त्यांच्या सोमवारी दुपारी साडेबारा वाजता मृत्यू झाला..
तर बुढ्ढीलेन येथील 42 वर्षीय व्यक्तीला 14 मे रोजी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याच दिवशी ते बाधित असल्याचे निदान झाले. त्याच्यावर उपचार सुरू असताना दुपारी दोन वाजता त्याचा मृत्यू झाला. लठ्ठपणा ,तीव्र श्वसविकार, उच्चरक्तदाब व कोरोना मुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळविले आहे.