बीड तहसिल कार्यालया समोरील एजंटांना हटवा नोटरी वकील संघाचे मागणी

Beed

बीड तहसिल कार्यालया समोरील एजंटांना हटवा नोटरी वकील संघाचे मागणी

बीड/प्रतिनिधी

बीड तहसिलचे आवारातील व फुटपाथवर बेकायदेशीर नोटरीचे बोर्ड लावून (नोटरी नसतानाही) जनतेची फसवणुक करणारे दलाल / एजेंन्ट विना परवाना बॉण्ड विक्री करणारे यांची पोलीसा मार्फत चौकशी करून नोटरी नमुद केलेल्या फुटपाथवरील त्यांचे टेबल व साहित्य जप्त करून त्यांचेवर कायदेशिर कार्यवाही करणे बाबत.माननीय जिल्हाधिकारी बीड यांच्या सेवेत खालील प्रमाणे नम्र निवेदन करण्यात येते की, आम्ही बीड येथे नोटरी व्यवसाय करत असून, आम्ही बीड न्यायालया मध्ये काम करत आहोत. आमच्या नोटरी पैकी कोणाचाही टेबल न्यायालयाच्या परिसराच्या बाहेर. रस्त्यावर अथवा तहसिल समोर नाही. परंतु काही दलाल व एर्जेन्ट लोक हे नोटरीच्या नावाचा बोर्ड कोणताही अधिकार व परवाना नसताना अनाधिकृतपणे लावत आहेत. तसे करून लोकांची दिशाभूल करून फसवणुक करत आहेत. लोकांकडून अव्याचे सच्चा पैसे घेत आहेत. त्यामुळे लोकांची फसवणुक होत आहे. विनाकारण आमच्या बद्दल समाजा मध्ये व लोकांमध्ये गैरसमजूत निर्माण होत आहे. तसेच सध्या कोरोनाचा काळ असतानाही तहसिल कार्यालया समोर विनाकारण एजेंट लोकांमार्फत गर्दि केली जात आहे तसेच त्यांना कुठलेही अधिकार नसताना काम करुन देतात असे भासवून लोकांची फेसबुणक केली जात आहे.तरी मा. साहेबांना विनंती की, बीड तहसिल कार्यालया समोरील तहसिलचे आवारातील व फुटपाथवर बेकायदेशीर नोटरीचे बोर्ड लावून (नोटरी नसतानाही) जनतेची फसवणूक करणारे कालाल / एजेन्ट बिना परवाना बॉण्ड विक्री करणारे यांची पालीसा मार्फत चौकशी करून नोटरी नमुद केलेल्या फुटपाथवरील त्यांचे टेबल व साहित्य जप्त करुन त्यांचेवर कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी वकील संघ कडुन केली.

Sharing

Visitor Counter