आ.संदिप भैय्यांचा बीड शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकार

आ.संदिप भैय्यांचा बीड शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकार
अमृत योजनेचे वीज कनेक्शन, एसटीपी प्लांटच्या जागेसाठी मंत्रालयात बैठक
नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरें घेणार आढावा
बीड/प्रतिनिधी
बीड शहरात सध्या विस्तारीत भागात पंधरा दिवसाला तर शहरात दहा दिवसाला पाणी येते, त्यातही अनेक वेळा खंड पडतो. बीड शहराला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अमृत योजनेला नळ कनेक्शन जोडल्याशिवाय बीड शहरात पाणी पुरवठा सुरळीत होवू शकत नाही. त्याकरिता अमृत योजनेचे वीज कनेक्शन जोडण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्याचबरोबर एसटीपी प्लांटची जागाही मिळत नसल्याने अडचणी येत आहेत. या बाबत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला असून बीड शहराला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी याप्रश्नी त्यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे बैठक लावण्याची विनंती केली होती. त्यानुसार आज नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे या योजने संदर्भात आढावा बैठक होणार आहे.
आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी बीड शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अमृत योजनेचे वीज कनेक्शन जोडणेबाबत व मलनिसारण योजनेचे काम एसटीपी प्लांटची जागा नसल्यामुळे बंद आहे. अमृत योजनेचे नळ कनेक्शन जोडल्याशिवाय शहर हद्दीत व शहराच्या विस्तारीत भागात नियमीतपणे पाणी पुरवठा शक्य नाही. या तांत्रिक अडचणी लक्षात घेता शासनस्तरावरून या मार्ग काढण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे बैठकीची आयोजन होवून सदर प्रश्न निकाली काढण्यास यावा अशी विनंती केली होती. त्यानुसार नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या निर्देशानुसार नगरविकास प्रधान सचिव, नवी-2 यांच्यास्तरावरून गुरूवार दि.3 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1.30 मिनिटांनी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला आ.संदिप भैय्या क्षीरसागर, सहव्यवस्थापकीय संचालक औरंगाबाद, सहसचिव नवी-33, उपसचिव नवी-17, मुख्य अधिकारी न.प.बीड, महावितरण संचालक, मुख्य अभियंता महावितरण लातूर, अधिक्षक अभियंता महावितरण बीड व इतर संबंधित अधिकार्यांनाही या बैठकीसाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. या बैठकीमुळे गेल्या अनेक दिवसापासून रखडलेला सदरील प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी आशा शहरातील नागरिकांना आहे.