जात प्रमाणपत्र पडताळणी त्रृटीच्या पूर्ततेसाठी 25 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

जात प्रमाणपत्र पडताळणी त्रृटीच्या पूर्ततेसाठी 25 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
बीड/वार्ताहर
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड कार्यालयात सन 2021-22 मध्ये 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशीत व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश असलेले तसेच सेवा व निवडणूक विषयक अर्जदारांनी जात पडताळणी प्रस्ताव त्रृटी पूर्ततेविना प्रलंबित आहेत. अर्जदारांना नोंदणी केलेल्या भ्रमणध्वनीवर लघु संदेश आणि नोंदणी केलेल्या ई - मेलद्वारे त्रृटी सुध्दा कळविण्यात आल्या आहेत. तरी सुध्दा अर्जदारांनी त्रुटींची पूर्तता केली नसल्यामुळे 25 फेब्रुवारीपर्यंत प्रलंबित प्रस्तावांना त्रृटी पूर्ततेसाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
जात पडताळणीसाठी अर्जदारांनी अद्यापपर्यंत त्रृटीची पूर्तता केलेली नसल्यास सुटीचे दिवस वगळून 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रकरणाची सद्यस्थिती प्रत्यक्षात येऊन जाणून घ्यावी, जेणेकरून अर्जदारांना व उमेदवारांना त्यांच्या प्रकरणात आलेल्या अडचणी दूर करता येतील.दि. 25फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्जदारांकडून त्रृटी पूर्तता / कागदपत्रांची पूर्तता न केल्यास त्यांच्या प्रकरणांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. त्रृटी पुर्ततेअभावी आपला जातीदावा समितीकडून फेटाळण्यात आल्यास तसेच शैक्षणिक प्रवेशासाठी, निवडणूक, सेवेसाठी अपात्र ठरल्यास याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार व उमेदवारांची राहील, असेही समितीने कळवले आहे.
