वाडिया वाचनालयास श्री . भारत सासणे व इंद्रजीत भालेराव यांची सदीच्छा भेट

वाडिया वाचनालयास श्री . भारत सासणे व इंद्रजीत भालेराव यांची सदीच्छा भेट
बीड/प्रतिनिधी
शहरातील ए . एच . वाडिया सार्वजनिक वाचनालयास माजी जिल्हाधिकारी तथा उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री . भारत सासणे तसेच ज्येष्ठ कविवर्य श्री . इंद्रजीत भालेराव यांनी आज दि . फेब्रुवारी 2022 रोजी सदीच्छा भेट दिली . या भेटीत त्यांना वाचनालयात सर्व विभागाची पहाणी करून संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांशी दैनंदिन कामकाजासंदर्भात चर्चा केली व समाधान व्यक्त केले . यावेळी त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला . मा . भारत सासणे यांचा सत्कार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री . अमोलकचंद सुराणा व कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री . दीपक कर्नावट यांनी शाल , पुष्पगुच्छ देऊन केला . तसेच ज्येष्ठ कवि श्री . इंद्रजीत भालेराव यांचा सत्कार विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस श्री . नामदेवराव क्षीरसागर व कार्यकारी मंडळाचे सरचिटणीस श्री . प्रदीप मुळे यांनी शाल , पुष्पगुच्छ देऊन केला . यावेळी श्री . भारत सासणे यांच्या सुविद्य पत्नी सौ . मीनाताई भारत सासणे याही उपस्थित होत्या त्यांचा सत्कार विश्वस्त सदस्या डॉ . रोहिणीताई वैद्य व संचालिका सौ . निलीमा पाटंगणकर यांनी केला . कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री . दीपक कर्नावट यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला . यावेळी विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस श्री . नामदेवराव क्षीरसागर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . बीडचा रेल्वेच्या भूसंपादनाचा विषय मा.सासणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लागल्याची आठवण सभागृहाला करुन दिली . या कार्यक्रमास हिशोबणीस अॅड . गोविंद कासट , वाचक , सभासद व कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यकारी मंडळाचे सरचिटणीस प्रदीप मुळे यांनी मानले .